Home क्रीडा IND vs NZ: तिसऱ्या दिवसअखेर भारतीय संघाची 118 धावांची मजबूत आघाडी, गिलचं शतक अवघ्या 2 धावांनी हुकलं

IND vs NZ: तिसऱ्या दिवसअखेर भारतीय संघाची 118 धावांची मजबूत आघाडी, गिलचं शतक अवघ्या 2 धावांनी हुकलं

0
IND vs NZ: तिसऱ्या दिवसअखेर भारतीय संघाची 118 धावांची मजबूत आघाडी, गिलचं शतक अवघ्या 2 धावांनी हुकलं
Photo: X (BCCI)

IND vs NZ: : भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली आहे. पहिल्या डावात न्यूझीलंडने फलंदाजी करताना 368 धावा केल्या होत्या. त्यामुळे भारतासाठी हे खडतर आव्हान ठरू शकतं असं वाटलं होतं. कारण न्यूझीलंडच्या भूमीत वेगवान गोलंदाजीच्या माऱ्याला सामोरं जाणं वाटतं तितकं सोपं नाही. पण हे सर्व अंदाज भारतीय फलंदाजांनी फोल ठरवले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने 1 गडी गमवून 159 धावा केल्या होत्या. तसेच 209 धावांनी भारतीय संघ पिछाडीवर होता. त्यामुळे तिसऱ्या दिवशी काय होतं? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून होतं. असं असताना केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, कर्णधार शुभमन गिल आणि विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत यांनी साजेशी कामगिरी केली आणि टीम इंडियाला संकटातून बाहेर काढलं. इतकंच काय तिसऱ्या दिवसअखेर भारताने 4 गडी गमवून 486 धावा केल्या असून 118 धावांची आघाडी घेतली आहे. चौथ्या दिवशी या धावात आणखी भर पडणार यात काही शंका नाही. भारताने पहिल्या डावात 200 पार धावांची आघाडी घेतली तर हा सामना जिंकण्याची संधी वाढेल.

https://www.prahaar.in/2026/11/21/gold-rate-today-significant-drop-in-gold-prices-gold-becomes-cheaper-by-11000-in-a-week-silver-also-plunges/

केएल राहुलचं शतक, तर कर्णधार शुभमन गिल कमनशिबी

न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या दिवशी केएल राहुल आणि देवदत्त पडिक्कल ही जोडी उतरली. या जोडीने खेळपट्टीवर चांगला जम बसवला आणि न्यूझीलंडच्या गोलंदाजांना घाम फोडला. पण देवदत्त पडिक्कल 175 चेंडूत 80 धावांची खेळी करून बाद झाला. त्याने केएल राहुलससोबत 165 धावांची भागीदारी केली. त्यानंतर केएल राहुल आणि शुभमन गिल यांची जोडी जमली. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी केली. या दरम्यान केएल राहुलने न्यूझीलंडच्या भूमीवर पहिलं शतक ठोकलं. केएल राहुलने 290 चेंडूंचा सामना केला आणि 136 धावा केल्या. या खेळीत त्याने 9 चौकार आणि 2 षटकार मारले. सेना देशांविरुद्ध सलामीवीर म्हणून शतक ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज होण्याचा मानही मिळवला.

दुसरीकडे, कर्णधार शुभमन गिल कमनशिबी ठरला. खरं तर शुभमन गिलचं शतक आरामात होईल असं वाटलं होतं. पण त्याचा खेळ 98 धावांवर आटोपला. त्याने 146 चेंडूंचा सामना केला आणि 9 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 98 धावा केल्या. त्याचं शतक अवघ्या 2 धावांनी हुकलं. जेकब डफीच्या गोलंदाजीवर क्लिन बोल्ड झाला आणि तंबूत परतला. दरम्यान, विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतला लय सापडल्याचं दिसून आलं. त्याने संघावरील कमी झाल्याचं पाहून थोडा आक्रमक खेळ केला. त्याने 62 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकार मारत नाबाद 55 धावांची खेळी केली. चौथ्या दिवशी त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. तर अंशुल कंबोज 2 चेंडूचा सामना करून नाबाद 0 धावांवर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here