Home देश घरात बनवलेले नूडल्स ठरले जीवघेणे; 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, मोठी बहीण गंभीर

घरात बनवलेले नूडल्स ठरले जीवघेणे; 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, मोठी बहीण गंभीर

0
घरात बनवलेले नूडल्स ठरले जीवघेणे; 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, मोठी बहीण गंभीर
AI Generated Image

घरात बनवलेल्या नूडल्सने एका कुटुंबाचा घास घेतला आहे. नूडल्स खाल्ल्यानंतर ७ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला असून तिची १८ वर्षीय मोठी बहीण मृत्यूशी झुंज देत आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. अन्नातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. ही दुर्दैवी घटना राजस्थानची राजधानी जयपूरमधील झोटवाडा भागातील मंगलम सिटी येथे गुरुवारी संध्याकाळी घडली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

मृत मुलीचं नाव पिहू (वय ७) असून तिची मोठी बहीण दिव्यांशी (वय १८) हिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पिहूचे आई-वडील चौमूमधील एका रुग्णालयात गेले होते. त्यांचा मुलगा तिथे दाखल आहे. आई-वडील संध्याकाळी घरी परतले, तेव्हा पिहू आणि दिव्यांशी खोलीत बेशुद्ध अवस्थेत आढळल्या. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेलं. तिथे डॉक्टरांनी पिहूला मृत घोषित केलं. पिहूचे वडील दिनेश कुमावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी २०२५ मध्ये त्यांचा विवाह मीना यांच्याशी झाला. मीना यांच्या पहिल्या पतीचं निधन झालं होतं. लग्नानंतर दिनेश, मीना आणि त्यांची ५ मुलं मंगलम सिटीत राहू लागली. दिनेश आणि मीना यांचा मुलगा गोविंद चौमू येथील रुग्णालयात दाखल असल्याने त्याला भेटायला दोघं गेले होते. त्यावेळी घरी दिव्यांशी (१८), गुलशन (१७), समर (१४) आणि पिहू (७) होती.

https://www.prahaar.in/2026/11/21/invited-to-a-party-at-night-and-then-a-shocking-incident-in-kashigaon-search-underway-for-four-accused/

गुरुवारी सकाळी मुलांनी जवळच्या किराणा दुकानातून ६० रुपयांचं नूडल्सचं पाकीट आणलं होतं. सकाळी १० च्या सुमारास समरने अर्धं पाकीट नूडल्स बनवलं. त्याने त्यातील अर्धे खाल्ले आणि बाकीचे शेगडीवरच भावंडांसाठी ठेवले. दुपारी ३ च्या सुमारास दिव्यांशी आणि पिहूने तेच उरलेले नूडल्स खाल्ले. नूडल्स खाऊन दोघी आपल्या खोलीत जाऊन झोपल्या. संध्याकाळी ५ वाजता आई मीना घरी परतल्या. त्यांनी मुलांना हाक मारली, पण प्रतिसाद मिळाला नाही. खोलीत जाताच त्यांना दिव्यांशी आणि पिहू बेडवर पडलेल्या दिसल्या. दिव्यांशीला उठवताच तिला उलट्या सुरू झाल्या, तर पिहू उठलीच नाही. सकाळी बनवून तसेच ठेवलेले नूडल्स खराब झाल्याने विषबाधा झाली का, की नूडल्सच्या पाकिटातच काही दोष होता, याचा तपास पोलीस करत आहेत. अन्नाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे. पिहूच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here