Home ताज्या घडामोडी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून भारतीय अर्थव्यवस्थेचे कौतुक, कमी व्याजदरावरून डोनाल्ड ट्रम्प यांनी फेडरल रिझर्व्हची केली कानउघाडणी

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून भारतीय अर्थव्यवस्थेचे कौतुक, कमी व्याजदरावरून डोनाल्ड ट्रम्प यांनी फेडरल रिझर्व्हची केली कानउघाडणी

0
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून भारतीय अर्थव्यवस्थेचे कौतुक, कमी व्याजदरावरून डोनाल्ड ट्रम्प यांनी फेडरल रिझर्व्हची केली कानउघाडणी
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारतीय अर्थव्यवस्थेचे कौतुक फोटो सौजन्य: सोशल मीडिया

मुंबई: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या कमी व्याजदरांची प्रशंसा केली असून अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेवर टीका केली आहे. ट्रम्प यांनी भारताचे उदाहरण देत म्हटले की, जर अमेरिकेने असेच उदार धोरण अवलंबले, तर त्यांची अर्थव्यवस्था आणखी वेगाने वाढू शकते. ते म्हणाले की, “जेव्हा अमेरिकेची आकडेवारी मजबूत असते, तेव्हा फेडरल रिझर्व्ह बँक व्याजदर वाढवून देशाला उद्ध्वस्त करते.”

ट्रम्प यांनी अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकवर राजकीय वरदहस्त असल्याचा आरोप केला आणि व्याजदरवाढीमुळे देशाचा विकास दरा कमी झाला आहे, अशी टिका त्यांनी केली आहे. व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ट्रम्प म्हणाले की, अमेरिकेत जगातील सर्वात कमी व्याजदर असायला हवेत. यावेळी त्यांच्यासोबत उपराष्ट्रपती जे. डी. व्हान्स आणि परराष्ट्र सचिव मार्को रुबियो सुद्धा उपस्थित होते. ट्रम्प यांनी भारताच्या विकास दराचा दाखला देत म्हटले की, जर अमेरिकेने व्याजदर कमी केले, तर त्यांचा विकास दर 15 ते 20 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो. ते म्हणाले, “व्याजदर खूप जास्त आहेत कारण आमची फेडरल रिझर्व्ह बँकेमध्ये राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणावर होत आहे. मी अध्यक्षांना दोष देत नाही, तर आमची फेडरल रिझर्व्ह खूप जास्त राजकीय झाली आहे या वस्तुस्थितीला दोष देत आहे.”

https://www.prahaar.in/2026/11/19/decline-in-gold-prices-why-did-the-price-of-gold-drop-by-10372-rupees-in-the-month-of-november-and-how-did-factor-from-the-us-contribute-to-this-decline/

ट्रम्प म्हणाले की, जेव्हा देशाची आर्थिक आकडेवारी चांगली असते, तेव्हा व्याजदर कमी केले पाहिजेत, पण नेमके उलट घडत आहे. ते म्हणाले, “जेव्हा आम्ही चांगली आर्थिक आकडेवारी जाहीर करतो, तेव्हा फेडरल रिझर्व्ह व्याजदर वाढवते. ते हे मुद्दाम करतात.” त्यानंतर ट्रम्प यांनी भारताचे उदाहरण दिले आणि अमेरिकेला त्यातून शिकण्याचा सल्ला दिला. “भारताकडे बघा, त्यांचा व्याजदर कमी आहे आणि जीडीपी ग्रोथ 7 टक्के आहे. जर आपणही तसे केले, तर आपली जीडीपी ग्रोथ 14, 15 किंवा अगदी 20 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकते. ही खरोखरच खेदाची गोष्ट आहे की, आपली इतकी चांगली कामगिरी होत असतानाच फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढवला जात आहे.” ट्रम्प यांनी अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे माजी अध्यक्ष ॲलन ग्रीनस्पॅन यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या कृतींची प्रशंसा केली. ते म्हणाले, “ॲलन ग्रीनस्पॅन हे एक उत्कृष्ट फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष होते. जेव्हा आर्थिक आकडेवारी चांगली असायची, तेव्हा ते व्याजदर कमी करायचे.”

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले की, जेव्हा आकडेवारी चांगली असते, तेव्हा पतपुरवठ्याची परिस्थितीही चांगली असते, पण आपण नेमके याच्या उलट करत आहोत. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने सप्टेंबर 2026 मध्ये, 2023 नंतर पहिल्यांदाच व्याजदर वाढवले. ट्रम्प यांनी दर कपातीची मागणी केली असली तरी, फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष किओघ वॉर्श यांनी महागाईला आळा घालण्याच्या गरजेवर भर दिला. ट्रम्प यांनी यावेळी भारताच्या आर्थिक विकासाचे तोंडभरून कौतुक केले आहे. अमेरिकेला यातूनच शिकण्याचा सल्ला देत आहेत. पण एक काळ असा होता की, तेव्हा अनेकजण भारतीय अर्थव्यवस्थेला ‘मृत’ म्हणून म्हणायचे. जुलै 2025 मध्ये, ट्रम्प यांच्या ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका जळजळीत पोस्टद्वारे भारत आणि रशियावर निशाणा साधला होता. ते म्हणाले होते की या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था मृत आहे. टॅरिफच्या वादाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी लिहिले होते, “भारत रशियासोबत काय करतो याची मला पर्वा नाही, पण ते एकत्र येऊन त्यांच्या मृत अर्थव्यवस्थेची आणखी दुर्दशा करू शकतात. याचा मला काही फरक पडत नाही.”

https://www.prahaar.in/2026/11/19/shortseller-muddy-waters-explosive-claim-hits-indian-origin-nvidia-ex-top-executive-jay-puri/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here