Bigg Boss 20 Extension: सर्वाधिक चर्चेत असणारा रिॲलिटी शो ‘बिग बॉस 20’ बद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. 6 सप्टेंबर 2026 रोजी सुरू झालेला हा सीझन त्यातील हाय-व्होल्टेज ड्रामा, वादविवाद आणि स्पर्धकांच्या नातेसंबंधांमुळे चांगला टीआरपी मिळवत आहे. त्यामुळे ‘बिग बॉस 20’ चा हा सिझन 2 ते 4 आठवड्यांपर्यंत लांबण्याची शक्यता आहे.
शोला मिळणारा जबरदस्त प्रतिसाद पाहता निर्माते ‘बिग बॉस 20’ दोन ते चार आठवडे पुढे ढकलण्याचा विचार करत आहेत. सुरुवातीला हा सीझन सुमारे १५ आठवड्यांचा असणार होता. त्यानुसार ग्रँड फिनालेचा एपिसोड 20 डिसेंबर 2026 रोजी टेलिकास्ट करण्यात आला असता. मात्र ‘बिग बॉस 20’ जर दोन-चार आठवडे खरंच लांबला, तर या शोचा ग्रँड फिनाले प्रेक्षकांना जानेवारी 2027 ला बघायला मिळेल.
https://www.prahaar.in/2026/11/20/kritis-outings-london-greece-and-now-this-post-fans-curious-about-kriti-and-kabiras-relationship/
‘बिग बॉस 20’ सध्या 11 व्या आठवड्यात येऊन पोहोचला आहे. यातच शोला मुदतवाढ मिळणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत, मात्र, चॅनल किंवा निर्मात्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. लव्ह गिल- स्काऊट, काझी, अरिशफा, माही, आम्रपाली, गुल्लू-कनिका, यंग, उदिती, मनोज या स्पधर्कांमुळे बिग बॉसचा TRP वाढला आहे. 20 नोव्हेंबर 2026 रोजी या प्रस्तावावर अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे बोलले जात आहे. जर मुदतवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली, तर प्रेक्षकांना ‘वीकेंड का वार’चे आणखी काही धमाकेदार भाग पाहायला मिळू शकतात.
‘बिग बॉस 20’ पुढे नेण्याच्या चर्चेमागे त्याचा चांगला TRP तसेच दुसरीकडे सलमान खानचं व्यस्त वेळापत्रक हेही एक कारण बोलले जात आहे. सलमान त्याच्या आगामी ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये, याशिवाय दिग्दर्शक वामशी पैडिपल्ली यांच्या ‘मॉन्स्टर’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये खूप व्यस्त आहे. त्यामुळे हे सर्व सांभाळत सलमानला ‘बिग बॉस 20’साठी वेळ देणंही भाग आहे. त्यामुळेच भाईजानच्या व्यस्त वेळापत्रकानुसार ‘बिग बॉस 20’ extend होऊ शकतो. अद्याप याविषयी अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.