Home ब्रेकिंग न्यूज India Electric Ship : भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक हायड्रोफॉइल जहाजाची महाराष्ट्रात यशस्वी चाचणी- मंत्री नितेश राणे यांनी दिली माहिती

India Electric Ship : भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक हायड्रोफॉइल जहाजाची महाराष्ट्रात यशस्वी चाचणी- मंत्री नितेश राणे यांनी दिली माहिती

0
India Electric Ship : भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक हायड्रोफॉइल जहाजाची महाराष्ट्रात यशस्वी चाचणी- मंत्री नितेश राणे यांनी दिली माहिती

मुंबई : जलवाहतुकीसाठी पर्यावरणपूरक आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या दिशेने महाराष्ट्राने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. भारतातील पहिल्या पूर्णपणे इलेक्ट्रिक हायड्रोफॉइल जहाजाची महाराष्ट्रात यशस्वी चाचणी सुरू असून, स्वीडनमधून आयात करण्यात आलेल्या ‘कॅन्डेला पी-१२’ या जहाजामुळे देशातील जलवाहतुकीच्या क्षेत्रात नव्या तंत्रज्ञानाची भर पडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. (India Electric Ship)

https://www.prahaar.in/2026/11/20/ibps-po-main-exam-results-declared-recruitment-for-7565-posts-qualified-candidates-to-get-an-opportunity-for-an-interview/

महाराष्ट्र शासन, रुरल एन्हान्सर्स ग्रुप आणि साधव शिपयार्ड्स लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. महाराष्ट्र सागरी मंडळाच्या माध्यमातून जागतिक दर्जाचे सागरी तंत्रज्ञान राज्यात आणण्याच्या प्रयत्नांचा हा महत्त्वाचा भाग आहे. पूर्णपणे विद्युत ऊर्जेवर चालणाऱ्या या जहाजाच्या यशस्वी चाचण्यांमुळे पर्यावरणपूरक जलवाहतुकीच्या पर्यायांना चालना मिळण्याची अपेक्षा आहे, असे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

‘कॅन्डेला पी-१२’ हे हायड्रोफॉइल तंत्रज्ञानावर आधारित जहाज स्वीडनमधून आयात करण्यात आले आहे. हायड्रोफॉइल तंत्रज्ञानामुळे जहाजाचा पाण्याशी होणारा संपर्क कमी होऊन ते पाण्याच्या पृष्ठभागावर उंचावलेल्या स्थितीत प्रवास करते. त्यामुळे जलवाहतुकीसाठी आधुनिक आणि अधिक कार्यक्षम पर्याय उपलब्ध होऊ शकतो.

जागतिक दर्जाचे सागरी तंत्रज्ञान महाराष्ट्रात आणून राज्याला शाश्वत जलवाहतुकीच्या क्षेत्रात आघाडीवर नेण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. महाराष्ट्र सागरी मंडळाच्या माध्यमातून अशा आधुनिक तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here