ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात 2018 मध्ये कसोटी मालिका पार पडली होती. या मालिकेतील एका सामन्यात चेंडूसोबत छेडछाड करण्यात आली होती. यासाठी सँडपेपरचा वापर करण्यात आला होता. मात्र ही कृती कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर सदर प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेटची नाचक्की झाली होती. तसेच क्रीडाविश्वात खळबळ उडाली होती. यानंतर डेविड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ आणि कॅमरन बेनक्रॉफ्ट यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर हे प्रकरण शांत झालं होतं. मात्र उस्मान ख्वाजाच्या पुस्तकात सँडपेपरगेट प्रकरणबाबत खुलासा करण्यात आला. या प्रकरणाबाबत संपूर्ण संघाला माहिती होतं, असं नमूद करण्यात आलं. याला डेविड वॉर्नरने दुजोरा दिला होता. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा ताजं झालं. पण पॅट कमिन्सने पुस्तकातील दावा आणि आरोप फेटाळून लावला होता. असं असताना या प्रकरणातील आरोपी असलेल्या बेनक्रॉफ्टने धक्कादायक खुलासे केले आणि पुन्हा एकदा वातावरण गरम झालं.
पॅट कमिन्ससोबत काय घडलं?
कॅमरन बेनक्रॉफ्टने सांगितलं की, ड्रेसिंग रुममध्ये प्रत्येकाला माहिती होतं की मैदानात बॉल टॅम्परिंग होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पॅट कमिन्स रडारवर आला. इतकंच त्याचं घरातून बाहेर निघणंही कठीण झालं आहे. त्याच्या घराबाहेरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात पॅट कमिन्स घराबाहेर उभा आहे आणि एक महिला रिपोर्टर सँडपेपरगेट प्रकरणी त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार करत आहे. या प्रकरणावर त्याची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करत आहे. पत्रकाराने प्रश्न विचारण्यापूर्वी माफी मागितली, पण कमिन्सने उत्तर दिले की, कदाचित तिला प्रश्न विचारल्याबद्दल तितकी खंत वाटत नसेल, जितकी ती दाखवत आहे.
CRAZY SCENES IN AUSTRALIA. 🤯
– Reporters arrived at Pat Cummins’ home to question him about Bancroft. https://t.co/DUHxa1RFQE
— Sheri. (@CallMeSheri1_) November 19, 2026
https://www.prahaar.in/2026/11/19/south-africa-defeats-bangladesh-by-9-wickets-causing-a-major-shake-up-in-the-world-test-championship-2025-2027-standings/
कॅमरन बेनक्रॉफ्ट काय म्हणाला?
कॅमरन बेनक्रॉफ्ट म्हणाला की, अनेक वर्षांपासून या प्रकरणाचं ओझं मनावर होतं. बेनक्रॉफ्ट म्हणाला की, ‘दक्षिण आफ्रिकेत मी सँडपेपर वापरल्याबद्दल फक्त आम्हा तिघांनाच माहीत नव्हते. संपूर्ण संघाला माहीत होते.’ बेनक्रॉफ्ट सांगितलं की, पहिल्या चौकशीदरम्यान याबाबत कही सांगितलं नव्हतं. कारण यामुळे इतरांच्या कारकिर्दीला धक्का बसला असता. तसेच ऑस्ट्रेलिया क्रिकेटची प्रतिष्ठा जपावी यासाठी सत्य उघड केलं नव्हतं.