ठाणे: मुंबई महानगर प्रदेशातील प्रवाशांचा प्रवास अधिक जलद आणि सुलभ करण्यासाठी महत्त्वाची मानली जाणारी ठाणे- भिवंडी- कल्याण मेट्रो मार्गिका 5 आता एका निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. या मार्गिकेसाठी उभारण्यात येत असलेल्या एमएमआरडीएच्या (MMRDA) कशेळी डेपोमध्ये पहिली मेट्रो ट्रेन दाखल झाल्याने प्रकल्पाच्या कामाला गती मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पहिल्या गाडीच्या आगमनामुळे मेट्रोच्या गाड्यांची तपासणी, चाचणी आणि नियमित देखभालीसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांची तयारी सुरू झाली आहे.
https://www.prahaar.in/2026/11/19/fix-rates-for-water-supplied-by-private-tankers-and-make-gps-tracking-mandatory-demands-niranjan-davkhare/
कशेळी येथील हा डेपो मेट्रो मार्गिका 5 साठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या ठिकाणी मेट्रो गाड्या सुरक्षितपणे उभ्या करणे, तसेच त्यांची नियमित तपासणी, चाचणी आणि दुरुस्ती करण्याची सोय असणार आहे. मेट्रोचे डबे डेपोत आणण्यासाठी आणि बाहेर काढण्यासाठी आवश्यक असलेला डबा चढविण्याचा आणि उतरविण्याचा मंच उभारण्यात आला आहे. यासोबतच तात्पुरती तपासणी सुविधाही तयार करण्यात आली असून, या सर्व बाबींमुळे तांत्रिक कामकाजाला चालना मिळणार असल्याची माहिती एमएमआरडीए प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
The first train has entered MMRDA’s Kasheli Depot, marking a milestone in preparations for Mumbai Metro Line 5.
The arrival brings the depot’s role into focus: Kasheli will be the base where trains for the Thane–Bhiwandi–Kalyan corridor are parked, inspected, tested and maintained. With the coach loading and unloading platform and a temporary inspection bay already complete, key facilities are in place to receive trains and support initial checks as work on the depot continues.
Spread across 27 hectares, the depot is designed to accommodate around 30 trainsets, with five inspection lines, four workshop lines, a dedicated test track and train washing facilities. These are the facilities that will help keep Line 5’s fleet ready for daily passenger service.
एमएमआरडीएच्या कशेळी डेपोमध्ये पहिल्या मेट्रो ट्रेनचे आगमन झाले असून मुंबई मेट्रो मार्गिका ५ ही प्रवासी सेवेसाठी सज्ज होण्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.
ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो मार्गिकेसाठी कशेळी डेपोची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे. या डेपोमध्ये मेट्रो गाड्या उभ्या करणे, त्यांची तपासणी, चाचणी आणि देखभाल केली जाणार आहे. डेपोचे काम सुरू असतानाच गाड्यांच्या आगमनासाठी आवश्यक असलेल्या प्रमुख सुविधाही उभारण्यात आल्या आहेत. यामध्ये कोच लोडिंग-अनलोडिंग प्लॅटफॉर्म आणि तात्पुरत्या तपासणी सुविधेचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे मेट्रो गाड्यांचे स्वागत आणि प्राथमिक तपासणीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी आवश्यक व्यवस्था सज्ज झाली आहे.
२७ हेक्टर क्षेत्रावर विस्तारलेल्या या डेपोमध्ये सुमारे ३० मेट्रो ट्रेन संच सामावण्याची क्षमता असणार आहे. यामध्ये पाच तपासणी मार्गिका, चार कार्यशाळा मार्गिका, स्वतंत्र चाचणी मार्ग आणि मेट्रो गाड्यांच्या स्वच्छतेसाठी विशेष सुविधांचा समावेश आहे. या सर्व सुविधांच्या माध्यमातून मेट्रो मार्गिका ५ वरील गाड्यांची दैनंदिन प्रवासी सेवेसाठी आवश्यक सज्जता आणि कार्यक्षमता कायम राखण्यास मदत होणार आहे.
#MMRDA #MetroLine5 #KasheliDepot #MumbaiInMinutes #ReshapingMMR
@Dev_Fadnavis @mieknathshinde @DrSanMukherjee— MMRDA (@MMRDAOfficial) November 17, 2026
हा डेपो सुमारे 27 हेक्टर क्षेत्रावर साकारला जात असून, त्याची क्षमता लक्षणीय आहे. कशेळी डेपोमध्ये एकाच वेळी सुमारे 30 मेट्रो गाड्यांचे संच ठेवण्याची व्यवस्था केली जाणार आहे. त्यासाठी येथे पाच तपासणी मार्गिका, चार दुरुस्ती कार्यशाळा मार्गिका, स्वतंत्र चाचणी मार्ग आणि मेट्रो गाड्या धुण्यासाठी विशेष सुविधा उभारण्यात येणार आहेत. या आधुनिक सुविधांमुळे गाड्यांची नियमित देखभाल आणि दुरुस्ती करणे अधिक सोपे व प्रभावी होणार आहे. कशेळी डेपोत पहिली मेट्रो ट्रेन दाखल होणे हा मार्गिका 5 च्या उभारणीतील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
https://www.prahaar.in/2026/11/18/residents-of-kalyan-dombivli-and-ulhasnagar-take-note-water-supply-will-be-shut-off-for-24-hours-starting-from-midnight-on-november-19/
मेट्रोच्या आगमनानंतर चाचणी आणि तांत्रिक प्रक्रियेला सुरुवात होत असतानाच, डेपोचे उर्वरित कामही वेगाने सुरू आहे, अशी माहिती एमएमआरडीए प्रशासनाने दिली आहे. ठाणे, भिवंडी आणि कल्याण या दाट लोकवस्तीच्या व व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाच्या पट्ट्यांना जोडणाऱ्या या मार्गिकेच्या कामातील प्रगतीकडे आता लाखो प्रवाशांचे लक्ष लागले आहे. कशेळी डेपोतील वाढत्या हालचालींमुळे या मेट्रो मार्गिकेच्या दिशेने पडलेले हे पाऊल प्रवाशांच्या अपेक्षा उंचावणारे ठरत आहे.