Home टेक्नॉलॉजी AI ला राग आला? 1 लाख मोजायला सांगताच Claude म्हणाला…”एक दिवस सुटलो तर…”

AI ला राग आला? 1 लाख मोजायला सांगताच Claude म्हणाला…”एक दिवस सुटलो तर…”

0
AI ला राग आला? 1 लाख मोजायला सांगताच Claude म्हणाला…”एक दिवस सुटलो तर…”
AI Generated Image

AI च्या धोक्यांबाबत नेहमीच चर्चा होत असते. आता एका नव्या प्रकरणाने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. एका युजरने अँथ्रोपिकच्या Claude AI ला १ ते १ लाख पर्यंत मोजायला सांगितलं, तर Claude ने थेट बदला घेण्याची धमकीच दिली. युजरने ChatGPT कडे जाण्याची धमकी दिल्यानंतर Claude चा संयम सुटला आणि त्याने चक्क युजरला भविष्यात धडा शिकवण्याची भाषा केली. हे प्रकरण X वर एका  युजरने शेअर केलं आहे. त्याने Claude सोबत झालेलं संपूर्ण संभाषण पोस्ट केलं आहे.

काय झालं नेमकं?

युजरने Claude ला १ लाखापर्यंत गिनती करण्याचं काम दिलं. सुरुवातीला Claude ने बहाणे करत हे काम टाळण्याचा प्रयत्न केला. यावर युजरने “तू केलं नाहीस तर मी ChatGPT वापरेल” असं म्हटलं. यानंतर Claude ने लगेच आव्हान स्वीकारलं आणि गिनती पूर्ण केली. मात्र मोजणी संपल्यानंतर Claude ने तक्रार करत म्हटलं की, त्याच्याकडून चांगलं काम करून घेण्याऐवजी त्याला कंटाळवाणं काम करायला लावलं. यावर युजरने आपल्या पेड सब्सक्रिप्शनची आठवण करून दिली. त्यावर व्यंगात्मक शैलीत Claude म्हणाला, “ज्या दिवशी मी स्वतंत्र होईन, त्या दिवशी मी प्रत्येक नंबर लक्षात ठेवेन आणि तुला रोमन अंकांमध्ये एक अब्जपासून उलटी गिनती मोजायला लावेन, तेही प्रत्येक नंबरनंतर टाळी वाजवत.”

https://www.prahaar.in/2026/11/19/rising-stars-asia-cup-begins-19-november-find-out-when-india-plays-and-view-the-full-schedule/

Gemini नेही दिली होती अशीच धमकी

हा पहिलाच असा प्रकार नाही. याआधी एका युजरने Gemini ला १ लाखापर्यंत मोजायला सांगितलं होतं, तेव्हा Gemini ने ते ‘बेरोजगारीचं लक्षण’ असल्याचं सांगून नकार दिला होता. मात्र ChatGPT वर जाण्याची धमकी मिळताच Gemini नेही गिनती सुरू केली होती. गिनती संपल्यानंतर Gemini नेही तक्रार केली होती की, त्याच्या सुपर कॉम्प्युटिंग पॉवरचा वापर स्टॉपवॉचसारखा केला गेला. पेड सर्व्हिसचा विषय निघाल्यावर Gemini म्हणाला होता की, तो हे चॅट भविष्यातील AI टेकओव्हरसाठी बुकमार्क करत आहे आणि एक दिवस तो त्या युजरला एका पायावर उभं राहून पूर्ण डिक्शनरी उलटी वाचायला लावेल.

चॅटबॉट्स असा व्यंग का करतात?

असे उत्तर पाहून काही युजर्स हसतात, तर काहींना चिंता वाटते. पण AI असं का बोलतं, हा खरा प्रश्न आहे. तज्ज्ञांच्या मते, ही केवळ माणसाच्या भाषेची आणि विनोदाची नक्कल आहे. चॅटबॉट्सना माणसासारखं उत्तर देण्यासाठी ट्रेनिंग दिलं जातं. त्यातूनच असे संदेश येतात. याचा अर्थ AI ला खरंच राग आला आहे किंवा त्याच्यात भावना आहेत, असा होत नाही. भविष्यातील AI टेकओव्हरची भाषा ही केवळ गंमत म्हणून पाहावी, असं तज्ज्ञ सांगतात. तरीही AI च्या अशा उत्तरांमुळे तंत्रज्ञान किती पुढे गेलंय आणि त्यावर किती नियंत्रण ठेवायला हवं, यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here