Home क्राईम Thane Police : ठाणे पोलीस आयुक्तांचे WhatsApp अकाउंट हॅक; 24 तासांनंतरही अश्लील व्हिडिओ हटवण्यात अडचणी

Thane Police : ठाणे पोलीस आयुक्तांचे WhatsApp अकाउंट हॅक; 24 तासांनंतरही अश्लील व्हिडिओ हटवण्यात अडचणी

0
Thane Police : ठाणे पोलीस आयुक्तांचे WhatsApp अकाउंट हॅक; 24 तासांनंतरही अश्लील व्हिडिओ हटवण्यात अडचणी
Cyber Crime (Google Photo)

Thane News: ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या WhatsApp अकाउंट हॅक झाल्याची घटना समोर आली आहे. हॅकर्सनी त्यांच्या WhatsApp स्टेटसवर अश्लील व्हिडिओ अपलोड केल्याचा दावा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, 24 तासांहून अधिक काळ उलटूनही हे व्हिडिओ हटवण्यात पोलिसांना यश आले नसल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे.

पोलीस आयुक्तांचे WhatsApp अकाउंट हॅक

मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे पोलीस आयुक्तांचे WhatsApp अकाउंट मागील दिवशी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास हॅक झाले. त्यानंतर हॅकर्सनी त्यांच्या स्टेटसवर अश्लील व्हिडिओ अपलोड केले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर अकाउंटवरील आक्षेपार्ह व्हिडिओ हटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू करण्यात आले.

या प्रकरणात ठाणे पोलीस आयुक्तालयातील अधिकारी आणि सायबर तज्ज्ञांची टीम काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे. 10 पेक्षा अधिक पोलीस उपायुक्तांसह विविध पथके या प्रकरणावर काम करत असल्याची माहिती आहे. मात्र, 24 तासांनंतरही स्टेटसवरील व्हिडिओ हटवण्यात अडचणी येत असल्याचे वृत्त आहे.

पोलीस आयुक्तांचे अकाउंट सुरक्षित नसेल तर सर्वसामान्यांचे काय?

सायबर गुन्हे रोखणे आणि नागरिकांच्या डिजिटल सुरक्षेबाबत जनजागृती करणे ही पोलिसांसमोरील महत्त्वाची जबाबदारी आहे. अशा परिस्थितीत पोलीस आयुक्तांचेच WhatsApp अकाउंट हॅक झाल्याने नागरिकांच्या सायबर सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

गेल्या काही काळात बनावट लिंक पाठवून मोबाईल किंवा बँक खात्याची माहिती चोरणे, सोशल मीडिया अकाउंट हॅक करणे, तसेच खासगी माहितीचा गैरवापर करण्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे अनोळखी लिंकवर क्लिक न करणे, संशयास्पद मेसेजला प्रतिसाद न देणे आणि सोशल मीडिया अकाउंटसाठी टू-स्टेप व्हेरिफिकेशन सुरू ठेवणे आवश्यक आहे.

या प्रकरणाचा तपास आणि अकाउंट सुरक्षित करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांबाबत अधिकृत माहिती समोर येणे बाकी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here