Home ताज्या घडामोडी Rasika Vengurlekar New Home: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम रसिका वेंगुर्लेकरचं घराचं स्वप्न पूर्ण; नव्या घराचा गृहप्रवेश!

Rasika Vengurlekar New Home: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम रसिका वेंगुर्लेकरचं घराचं स्वप्न पूर्ण; नव्या घराचा गृहप्रवेश!

0
Rasika Vengurlekar New Home: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम रसिका वेंगुर्लेकरचं घराचं स्वप्न पूर्ण; नव्या घराचा गृहप्रवेश!
Video Grabbed instagram

Rasika Vengurlekar New Home: मुंबईत आपलं स्वतःच हक्काचं घर असावं अस प्रत्येकाचं स्वप्न असत. त्यासाठी सगळेचजण दिवसरात्र मेहनत घेत असतात. मग त्यात सामान्य माणूस असो किंवा कलाकार. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi hasyajatra) फेम मराठी अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर (Rasika Vengurlekar) कॉमेडी शोमधून घराघरात पोहोचली. तिने आपल्या कारकि‍र्दीत मालिकांमध्येही काम केलं आहे. नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून रसिका तिच्या चाहत्यांना तिच्या आयुष्याबद्दल माहिती देत असते. त्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. सध्या तिच्या चर्चेत असण्यामागचं कारण तिने हक्काचं स्वत:चं घर घेतलं आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करुन तिने यासंदर्भात माहिती दिली आहे. या व्हिडीओतून तिने गृहप्रवेशाची झलक शेअर केली आहे. सध्या अभिनेत्रीच्या व्हिडीओची तिच्या चाहत्यांमध्ये आणि नेटकऱ्यांमध्ये चर्चा सुरु आहे. सिनेकलाकार तसेच मित्रमंडळींनी कमेंट करुन तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

https://www.prahaar.in/2026/11/18/life-threatening-bike-stunts-on-the-western-express-highway-5-youths-arrested-following-a-viral-video/

रसिका वेंगुर्लेकरनं घेतलं स्वत:चं हक्काचं घर

रसिका वेंगुर्लेकर हिची ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी शोमधून ओळख निर्माण झाली. तिने या शोमधून प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलं आणि प्रेक्षकांच्या मनात स्थानं निर्माण केलं. पण सध्या नव्या घरामुळे रसिका वेंगुर्लेकरची विशेष चर्चा होत आहे. अभिनेत्रीचं हक्काचं घर घेण्याचं स्वप्न अखेर पूर्ण झालं आहे. अभिनेत्रीने गृहप्रवेशाचा खास व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिने पारंपारिक पद्धतीने पूजा केली आहे, असे दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rasika (@rasikavengurlekarofficial)

या व्हिडिओमध्ये अभिनेत्रीने आपल्या पतीसोबतचे काही फोटोस व्हिडीओमध्ये टाकले आहेत. यात घराचा मुख्य दरवाजा, बाल्कनी दिसत आहे. तिने सुरुवातीला घराची पूजा केली. नंतर घराच्या चावीसोबत काही फोटोज शेअर केले आहेत. व्हिडिओमध्ये रसिकाचा आनंद तिच्या चेहऱ्यावरून दिसत आहे. अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करत लक्षवेधी कॅप्शनही दिलं आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘A New Home, New Dreams, and a Beautiful New Beginning. This Diwali brought so much more happiness into our lives. Feeling blessed and Grateful ‘. तिने आपल्या भावना कॅप्शनमधील शब्दांतून व्यक्त केलं आहे. अभिनेत्रीच्या या व्हिडीओवर नेटकरी तसेच सिनेकलाकारांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. सिनेकलाकार तसेच मित्र मंडळींनी शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here