Home क्रीडा IPL 2027: कोलकाता नाईट रायडर्सने अजिंक्य रहाणेला सोडलं, आता कोण होणार कर्णधार?

IPL 2027: कोलकाता नाईट रायडर्सने अजिंक्य रहाणेला सोडलं, आता कोण होणार कर्णधार?

0
IPL 2027: कोलकाता नाईट रायडर्सने अजिंक्य रहाणेला सोडलं, आता कोण होणार कर्णधार?
IPL 2027: कोलकाता नाईट रायडर्सने अजिंक्य रहाणेला सोडलं, आता कोण होणार कर्णधार? (Photo: ANI)

आयपीएल 2027 स्पर्धेपूर्वी कोलकाता नाईट रायडर्स संघसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. त्याला कारणंही तसंच आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाने आयपीएल मिनी लिलावापूर्वी काही खेळाडूंना रिलीज केलं आहे. या यादीत अजिंक्य रहाणे याचंही नाव आहे. रहाणे एक अनुभवी आणि कर्णधारपदाचा दांडगा अनुभव असलेला खेळाडू आहे. त्याच्या जागी नव्या कर्णधाराचा शोध घेणं आवश्यक आहे. त्याामुळे पुढच्या पर्वात केकेआर संघाची धुरा कोण सांभाळणार? हा प्रश्न आहे. असं असताना आता फिनिशर म्हणून भूमिका बजावणाऱ्या रिंकु सिंहचं नाव चर्चेत आहे. मागच्या पर्वात रिंकु सिंहकडे उपकर्णधारपदाची धुरा होती. इतकंच काय तर देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्तर प्रदेश संघाची धुरा सांभाळली आहे. त्यामुळे त्याचं नाव चर्चेत असणं सहाजिकच आहे. त्यात श्रेयस अय्यरला सोडण्याची मोठी चूक केकेआरने केलं आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात केकेआर 2025 मध्ये चॅम्पियन झाली होती. मात्र त्यांनी त्याला रिलीज केलं.

हार्दिक पांड्याचं गणित फिस्कटलं आणि केकेआरचा प्लान फसला?

आयपीएल ट्रेड विंडोत हार्दिक पांड्यासाठी कोण पुढाकार घेणार? याची चर्चा रंगली होती. हार्दिक पांड्यासाठी केकेआर संघही उत्सुक होता. मीडिया रिपोर्टनुसार, हार्दिक पांड्यासाठी अंगकृष रघुवंशी आणि कॅमरून ग्रीन या खेळाडूंना देण्याची तयारीही होती. या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या असताना हार्दिक पांड्याचं गणित फिस्कटलं. केकेआरचं गणित सुटलं असतं तर कदाचित अष्टपैलू कर्णधार संघात असता. कारण कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्स संघाला जेतेपद मिळवून दिलं आहे. इतकंच काय तर 2023 मध्ये अंतिम फेरी गाठली होती. पण हार्दिक पांड्याला काही संघात घेण्यात केकेआरला यश आलं नाही. त्यामुळे आता नव्या कर्णधाराचा शोध घ्यावा लागणार आहे.

https://www.prahaar.in/2026/11/18/wtc-2025-27-points-table-major-shift-in-the-standings-ahead-of-the-ind-vs-nz-test-series-two-teams-suffer-a-setback/

रिंकु सिंह कर्णधार होणार! पण का?

अजिंक्य रहाणेला सोडल्यानंतर रिंकु सिंहचं नाव कर्णधार म्हणून येणं सहाजिकच आहे. कारण रिंकु सिंह गेल्या काही वर्षांपासून कोलकाता नाईट रायडर्स संघाचा भाग आहे. फ्रेंचायझीच्या विश्वासू खेळाडूंपैकी एक आहे. कारण त्याने अनेक सामन्यात संघाला विजय मिळवून दिला आहे. कठीण वेळेत त्याने संघासाठी फलंदाजी केली आहे. खासकरून डेथ ओव्हरमध्ये सामना संपवण्याची ताकद आहे.इतकंच काय तर संघाची संस्कृती, खेळाडू आणि फ्रेंचायझीबाबत चांगल्या प्रकारे माहिती आहे. रिंकु सिंहचा स्वभाव एकदम शांत आहे. पण केकेआर फ्रेंचायझी अनुभवी खेळाडूला कर्णधार करते का? किंवा कर्णधार म्हणून दुसऱ्या खेळाडूची नियुक्ती करते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here