Home ब्रेकिंग न्यूज Mumbai Food Safety: मुंबईतील हॉटेल्स, रेस्तराँमध्ये लाईव्ह किचन स्क्रीन बसवणे बंधनकारक

Mumbai Food Safety: मुंबईतील हॉटेल्स, रेस्तराँमध्ये लाईव्ह किचन स्क्रीन बसवणे बंधनकारक

0
Mumbai Food Safety: मुंबईतील हॉटेल्स, रेस्तराँमध्ये लाईव्ह किचन स्क्रीन बसवणे बंधनकारक
(Photo: AI Generated Image)

मुंबई (विशेष प्रतिनिधी): खाद्यपदार्थाच्या गुणवत्तेबाबत पारदर्शकता निर्माण व्हावी आणि नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण व्हावे यासाठी मुंबईतील सर्व हॉटेल, रेस्तराँ, तसेच इतर ठिकाणी खाद्यपदार्थांच्या खाण्यास जाणाऱ्या ग्राहकांना सहजपणे दिसतील अशा ठिकाणी ‘लाईव्ह किचन स्क्रीन’ बसविण्याची मागणी होत आहे. जेणेकरून, या स्क्रीनच्या माध्यमातून स्वयंपाकघरामध्ये खाद्यपदार्थ तयार करताना स्वच्छता, अन्नपदार्थांची योग्य हाताळणी, कर्मचाऱ्यांकडून पाळण्यात येणारी स्वच्छतेची मानके तसेच अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन याबाबत ग्राहकांना प्रत्यक्ष दृश्य स्वरूपात माहिती उपलब्ध होईल.(Live Kitchen Mumbai)

https://www.prahaar.in/2026/11/18/attempt-to-sell-md-drug-from-a-rickshaw-foiled-three-taken-into-custody-in-market-yard/

राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाचे नगरसेवक अजित रावराणे यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे ही मागणी केली आहे. या ठरावाच्रूा सूचनेमध्ये अजित रावराणे यांनी यांनी असे म्हटले आहे की, मुंबई हॉटेल, रेस्टॉरंट, उपहारगृहे तसेच विविध खाद्यपदार्थांची विक्री अन्नपदार्थाचे सेवन करतात. नागरिकांना सुरक्षित, आरोग्यदायी, स्वच्छतापूर्ण व गुणवत्तापूर्ण अन्नपदार्थ करणाऱ्या आस्थापनांमध्ये स्थानिक नागरिकांसह देश-विदेशांतून येणारे पर्यटक मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देणे ही संबंधित आस्थापनांची जबाबदारी असून, त्यासाठी स्वयंपाकघरातील स्वच्छता, अन्नपदार्थ हाताळण्याची पद्धत, अन्नपदार्थांची साठवणूक, वापरण्यात येणारी उपकरणे व भांडी यांची स्वच्छता तसेच अन्नसुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.(Mumbai Restaurants)

https://www.prahaar.in/2026/11/18/state-government-has-decided-to-transfer-three-senior-ias-officers-atul-patne-shaila-a-and-swati-mhase-patil/

मात्र, अनेक खाद्यपदार्थ अयोग्य विल्हेवाट, अन्नपदार्थांची अयोग्य साठवणूक व स्वच्छतेकडे दर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी विकी करणाऱ्या आस्थापनांच्या स्वयंपाकघरांमध्ये अस्वच्छता, अन्नपदार्थाची अयोग्य हाताळणी, कचऱ्याची साचण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करणे वीचंमलबजावणी करताना भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएआय) यांच्या नियमांचे व तसेच खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत पारदर्शकता निर्माण करणे आवश्यक आहे.

या उपक्रमाची आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून ‘लाईव्ह किचन स्क्रीन’ उपक्रम राबविण्यात येणे गरजेचे अून संबंधित कायदेशीर तरतुदींचे पालन करणेही तितकेच आवश्यक असल्याचेही अजित रावराणे यांनी सांगितले.(Mumbai Food Safety)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here