आयपीएल 2027 स्पर्धेसाठी मिनी लिलाव प्रक्रिया डिसेंबर महिन्यात पार पडणार आहे. या लिलाव प्रक्रियेपूर्वी ट्रेड विंडोचा बाजार गरम झाला आहे. हार्दिक पांड्या असो की इतर काही खेळाडू यांची ट्रेड यशस्वीरित्या पार पडली आहे. असं असताना सनरायझर्स हैदराबादच्या गोटात मात्र चिंतेचं वातावरण आहे. कारण आयपीएल 2027 स्पर्धेपूर्वी सनरायझर्स हैदराबादला मोठा धक्का बसला आहे. आक्रमक फलंदाज असलेल्या ट्रेव्हिस हेडने या स्पर्धेपूर्वी मोठा निर्णय घेतला आहे. आयपीएल 2027 स्पर्धेत ट्रेव्हिस हेड खेळणार नाही. त्यामुळे अभिषेक शर्मा आणि ट्रेव्हिस हेड ही जोडी क्रीडाप्रेमींना पाहता येणार नाही. पण ट्रेव्हिस हेडने असा निर्णय घेण्याचं कारण काय? आयपीएल 2027 स्पर्धेत का खेळणार नाही? असे एक ना अनेक प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. असाच प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर त्याचं उत्तर तुम्हाला पुढे मिळेल.
…ट्रेव्हिस हेड खेळणार नाही!
ट्रेव्हिस हेड आयपीएल 2027 स्पर्धेत न खेळण्याचं कारण म्हणजे वर्कलोड आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये राष्ट्रीय संघाशी असलेली बांधिलकी… क्रिकबजच्या रिपोर्टनुसार, ट्रेव्हिस हेडन सनरायझर्स हैदराबादला आपल्या निर्णयाबाबत सांगितलं आहे. ट्रेव्हिस हेडने असा निर्णय घेतल्याने सनरायझर्स हैदराबादला मोठा धक्का आहे. कारण त्याच्या या निर्णयामुळे बॅटिंग लाईनअप पूर्णपणे अस्तव्यस्त होईल. पण मिनी लिलावापूर्वी सनरायझर्स हैदराबादच्या पॉकेटमध्ये 14 कोटींची भर पडली आहे. ट्रेव्हिस हेड पाच कॅप्ड प्लेयरपैकी एक होता. त्यामुळे त्याला फ्रेंचायझीने रिटेन केलं होतं. आता ट्रेव्हिस हेडची जागा भरून काढण्याचं आव्हान सनरायझर्स हैदराबादपुढे असणार आहे.
https://www.prahaar.in/2026/11/17/ind-vs-nz-the-test-series-against-new-zealand-wont-be-easy-why-did-captain-shubman-gill-say-this/
ट्रेव्हिस हेडला आयपीएल 2024च्या लिलावात सनरायझर्स हैदराबादने 6.8 कोटी रुपयांना खरेदी केलं होतं. त्यानंतर आयपीएल 2025 स्पर्धेच्या मेगा लिलावापूर्वी त्याला 14 कोटी रुपयांना रिटेन केलं होतं. ट्रेव्हिस हेडने सनरायझर्स हैदराबादसाठी 3 पर्व खेळली आणि 43 सामन्यात एक शतक आणि 9 अर्धशतकं ठोकली. यात त्यने 13 हजाराहून अधिक धावा केल्या. सनरायझर्स हैदराबाद संघात रुजू होण्यापूर्वी ट्रेव्हिस हेड आरसीबीचा भाग होता. आरसीबीसाठी त्याने एका पर्वात 7 सामने आणि 151 धावा केल्या होत्या.
ऑस्ट्रेलिया पुढच्या वर्षी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी पात्र ठरण्याची शक्यता आहे. ही स्पर्धा आयपीएल नंतर लगेच होणार आहे. त्यानंतर लगेचच एशेज आणि वनडे वर्ल्डकप स्पर्धाही आहे. या स्पर्धा पाहता ट्रेव्हिस हेडने हा निर्णय घेतला आहे.