मनिला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या फिलिपिन्स दौऱ्यादरम्यान मंगळवारी मनिला येथील ऐतिहासिक ‘खालसा दिवाण’ गुरुद्वाराच्या आधुनिकीकरण आणि पुनर्विकासाच्या भूमिपूजन सोहळ्यात सहभाग घेतला. शेकडो वर्षांचा वारसा लाभलेल्या या शीख प्रार्थना स्थळाच्या नव्या स्वरूपाचा पाया पंतप्रधानांच्या हस्ते रचण्यात आला. परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) जारी केलेल्या निवेदनानुसार, हा गुरुद्वारा प्रथमतः १९०१ मध्ये स्थापन करण्यात आला आणि १९०३ मध्ये तो औपचारिकपणे संघटित झाला. त्यानंतर १९२४ मध्ये ‘खालसा दिवाण’ म्हणून याची अधिकृत नोंदणी करण्यात आली. फिलिपिन्समधील सर्वात जुना गुरुद्वारा असण्याचा मान या वाड्याला मिळाला असून, तो मनिलामधील शीख आणि इतर समुदायांसाठी अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहिला आहे.
https://www.prahaar.in/2026/11/17/mumbai-shocker-53-year-old-passenger-hit-by-knife-thrown-during-fight-inside-moving-virar-churchgate-fast-local/



