Home क्रीडा IPL 2027 Retention: आयपीएल लिलावापूर्वी हेड, मिचेल स्टार्कसह दिग्गजांना दाखवला बाहेरचा रस्ता; पाहा सर्व 10 संघांची यादी

IPL 2027 Retention: आयपीएल लिलावापूर्वी हेड, मिचेल स्टार्कसह दिग्गजांना दाखवला बाहेरचा रस्ता; पाहा सर्व 10 संघांची यादी

0
IPL 2027 Retention: आयपीएल लिलावापूर्वी हेड, मिचेल स्टार्कसह दिग्गजांना दाखवला बाहेरचा रस्ता; पाहा सर्व 10 संघांची यादी
IPL 2027 Retention: आयपीएल लिलावापूर्वी हेड, मिचेल स्टार्कसह दिग्गजांना दाखवला बाहेरचा रस्ता; पाहा सर्व 10 संघांची यादी (Photo: ANI)

आयपीएल 2027 स्पर्धेच्या लिलावापूर्वी सर्व फ्रेंचायझींनी संघातून रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. आयपीएल 2027 स्पर्धेसाठी लिलाव प्रक्रिया 16 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. त्यामुळे सर्वच संघांनी रिलीज आणि रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यानंतरही ट्रेड विंडो खुली असणार आहे. लिलावाच्या एक आठवडा आधीपर्यंत खेळाडूंची अदलाबदल केली जाऊ शकते. सनरायझर्स हैदराबादने आक्रमक फलंदाज ट्रेव्हिस हेडला रिलीज केलं आहे. खरं तर त्याने या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. कारण राष्ट्रीय संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचा त्याचा मानस आहे. त्यामुळे त्याला रिलीज केल्याचं बोललं जात आहे.

  • सनरायझर्स हैदराबादने रिलीज केलेले खेळाडू : ट्रेव्हिस हेड, कामिंदु मेंडिस, जयदेव उनाडकट, दिलशान मधुशंका, ओंकार तरमले, अमित कुमार, शिवम मावी, गेराल्ड कोत्झिया, डेविड पेन
  • दिल्ली कॅपिटल्सने रिलीज केलेले खेळाडू: नितीश राणा, अभिषेक पोरेल, पाथुम निसंका, बेन डकेट, करूण नायर, साहिल पारेख, दुष्मंता चमिरा, काइल जेमिसन, रेहान अहमद, मिचेल स्टार्क
  • चेन्नई सुपर किंग्सने रिलीज केलेले खेळाडू: एमएस धोनी, मॅट शॉर्ट, हेनरी, फॉल्क्स, प्रशांत वीर, अमन खान, कुलदीप यादव, आकाश मढवाल, डियन फॉरेस्टर, मॅकनेल नोरोन्हा
  • लखनौ सुपर जायंट्सने रिलीज केलेले खेळाडू: ब्रित्झ्के, एनरिक नॉर्खिया, जॉर्ज लिंडे, हसरंगा, नमन तिवारी, अरशीन कुलकर्णी
  • कोलकाता नाईट रायडर्सने रिलीज केलेले खेळाडू: अजिंक्य रहाणे, आकाश दीप, ब्लेसिंग मुजरबानी, दक्ष कामरा, लवनीत सिसोडिया, मथिशा पथिराना, मुस्तफिझुर रहमान, नवदीप सैनी, रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी, तेजस्वी सिंह, उमरान मलिक

https://www.prahaar.in/2026/11/17/dhonis-new-innings-begins-he-will-take-on-the-role-of-mentor-for-csk-in-ipl-2027/

  • मुंबई इंडियन्सने रिलीज केलेले खेळाडू: ट्रेंट बोल्ट, दीपक चाहर, अल्लाह मोहम्मद गझनफर, अथर्व अंकोलेकर, केशव महाराज, मोहम्मद इजहार, दिनेश मालेवार, मयंक मार्कण्डेय, मयंक रावत
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने रिलीज केलेले खेळाडू: जॅकब बेथल, ग्लीसन, मंगेश यादव, सात्विक देसवाल, विहान मल्होत्रा
  • राजस्थान रॉयल्सने रिलीज केलेले खेळाडू: एडम मिल्न, मफाका, तुषार देशपांडे, कुलदीप सेन, युद्धवीर सिंह चरक, विग्नेश पुथुर, रवि सिंह
  • गुजरात टायटन्सने रिलीज केलेले खेळाडू: इशांत शर्मा, ल्यूक वुड, कुलवंत खेजरोलिया, शाहरूख खान, कॉनर एस्टरहुइजेन
  • पंजाब किंग्सने रिलीज केलेले खेळाडू: लॉकी फर्ग्युसन, मिच ओवन, नेहल वढेरा, प्याला अविनाष, परवीनदुबे, विशाल निशाद

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here