Home मनोरंजन Ramayana : बॉक्स ऑफिसवर ‘रामायण’चा धुमाकूळ ! जगभरात 1,379 कोटींची कमाई, ‘धुरंधर’लाही टाकले मागे

Ramayana : बॉक्स ऑफिसवर ‘रामायण’चा धुमाकूळ ! जगभरात 1,379 कोटींची कमाई, ‘धुरंधर’लाही टाकले मागे

0
Ramayana : बॉक्स ऑफिसवर ‘रामायण’चा धुमाकूळ ! जगभरात 1,379 कोटींची कमाई, ‘धुरंधर’लाही टाकले मागे

मुंबई : नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळवले आहे. रणबीर कपूर, साई पल्लवी, यश, आदिनाथ कोठारे आणि रवी दुबे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची कमाई दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. प्रदर्शनानंतर अवघ्या ११ दिवसांत चित्रपटाने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठा गल्ला जमवला आहे. विशेष म्हणजे, जगभरातील कमाईच्या बाबतीत या चित्रपटाने ‘धुरंधर’लाही मागे टाकले आहे.

दुसऱ्या रविवारीही कमाईचा धडाका

‘रामायण’च्या ११व्या दिवसाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. दुसऱ्या रविवारी चित्रपटाच्या कमाईत चांगली वाढ झाल्याचे आकडे समोर आले आहेत. हिंदी भाषेत चित्रपटाने सर्वाधिक कमाई केली असून, इतर भाषांमधूनही त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

उपलब्ध आकडेवारीनुसार, दुसऱ्या रविवारी हिंदी भाषेतून ५५ कोटी रुपयांची कमाई झाली. तर कन्नडमधून ५.७५ कोटी, मल्याळममधून ५ कोटी, तमिळमधून ४.७५ कोटी आणि तेलुगूमधून ४.५० कोटी रुपयांचा गल्ला जमवला. यामुळे भारतातील चित्रपटाचे एकूण ग्रॉस कलेक्शन ९०९ कोटी रुपये, तर नेट कलेक्शन ७६०.६० कोटी रुपयांवर पोहोचल्याचे सांगितले जात आहे.

https://www.prahaar.in/2026/11/15/panchayat-5-amazon-prime-video-ott-release-date-change-jitendra-kumar-hit-series-for-latest-update-click-here/

जगभरातील कमाई १३०० कोटींच्या पुढे

भारतीय प्रेक्षकांसोबतच परदेशातील प्रेक्षकांकडूनही ‘रामायण’ला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. ट्रेड ट्रॅकर सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने परदेशातही मोठी कमाई केली आहे. ११ दिवसांतील परदेशातील एकूण कलेक्शन ४७०.५० कोटी रुपयांवर पोहोचल्याचा दावा करण्यात आला आहे.

यासह चित्रपटाचे जगभरातील ग्रॉस कलेक्शन १,३७९.५० कोटी रुपये झाले आहे. या कामगिरीमुळे ‘रामायण’ने बॉक्स ऑफिसवर नवा विक्रम नोंदवला असून, कमाईच्या बाबतीत रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ चित्रपटाच्या १,३०७ कोटी रुपयांच्या आकड्यालाही मागे टाकल्याचे वृत्त आहे.

दीपिका चिखलिया आणि परिणीती चोप्राकडून कौतुक

‘रामायण’ला केवळ चाहत्यांचाच नव्हे, तर मनोरंजन विश्वातील कलाकारांचाही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. छोट्या पडद्यावरील सीतेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलिया यांनी चित्रपटाच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. चित्रपट मोठी कामगिरी करेल, असा विश्वास आपल्याला आधीपासूनच असल्याचे त्यांनी म्हटले.

अभिनेत्री परिणीती चोप्रानेही सोशल मीडियावर चित्रपटाचे कौतुक केले. आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून तिने चित्रपटातील व्हीएफएक्स आणि कथानकाचे विशेष कौतुक केले. चित्रपट पाहताना आपणही त्या विश्वाचा एक भाग असल्याचा अनुभव आल्याचे तिने सांगितले. एकीकडे बॉक्स ऑफिसवर वाढणारी कमाई आणि दुसरीकडे कलाकारांकडून होत असलेले कौतुक यामुळे ‘रामायण’ची चर्चा सर्वत्र रंगली आहे. आगामी दिवसांत हा चित्रपट कमाईचे आणखी कोणते विक्रम प्रस्थापित करतो, याकडे सिनेरसिकांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here