भारताने पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताने न्यूझीलंडचा 3-1 ने धुव्वा उडवला. पाचव्या वनडे सामन्यात भारत जिंकेल की नाही अशी स्थिती होती. कारण भारताने फक्त 209 धावांचं आव्हान दिलं होतं. अशा स्थितीत भारताने न्यूझीलंडला 22 धावांनी पराभूत केलं आणि विजयी पताका फडकावली. या सामन्यात अर्शदीप सिंगचं योगदान महत्त्वाचं ठरलं. आघाडीचे फलंदाज स्वस्तात बाद झाले होते. पण खालच्या फळीत फलंदाजी करताना त्याने मोहम्मद सिराजसोबत 26 धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे भारताचा विजय मिळाला असं म्हणायला हकरत नाही. कारण याच धावा न्यूझीलंडच्या पराभवाचं कारण ठरलं. अर्शदीप सिंगने फलंदाजी करताना फक्त चार चेंडूत 14 धावांची खेळी केली. या खेळीत अर्शदीप सिंगने दोन षटकार मारले. इतकंच काय गोलंदाजीत मोलाचं योगदान दिलं. त्याने 30 धावा देत तीन विकेट काढल्या आणि टीम इंडियाला विजय मिळवून दिला.
काय म्हणाला अर्शदीप सिंग?
अर्शदीप सिंगला या कामगिरीसाठी सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. अर्शदीप सिंगने या खेळीबाबत खुलासा केला आणि विजयाचं गुपित सांगितलं. अर्शदीप सिंग म्हणाला की, “फलंदाजी करताना इशानच्या भागीदारीने एक विशिष्ट वातावरण निर्माण केले होते. मला वाटले की आपण झुंज देऊ शकतो आणि आपल्याला सहज विकेट द्याची नाही. त्यामुळे, तुम्ही संपूर्ण षटक एका टोकाकडून खेळलात आणि इशानने धावा केल्या. मला वाटले की त्या धावा निर्णायक ठरतील.” अर्शदीप सिंग पुढे म्हणाला की, “माझा प्रयत्न होता आणि मला त्याची अपेक्षाही होती, कारण त्याने संपूर्ण मालिकेत शॉर्ट बॉल टाकला होता. त्यामुळे, मी त्या चेंडूची वाट पाहत होतो. म्हणून, मी माझी बॅट फिरवली आणि चेंडू कनेक्ट झाला आणि छान मध्यभागी लागला.
https://www.prahaar.in/2026/11/16/in-the-syed-mushtaq-ali-trophy-match-against-gujarat-mumbai-captain-suryakumar-yadav-smashed-a-blistering-half-century/
अर्शदीप सिंगने सांगितलं की, भारतासाठी डाव संपल्यानंतर सिराजने या अतिरिक्त धावांवर जोर दिला होता. त्यावेळेस या धावांचं महत्त्व कळलं नाही. पण नंतर सामन्याचं चित्र पाहिलं तर त्या धावांचं महत्त्व कळलं. कारण न्यूझीलंडला 22 धावांनी पराभवाचं तोंड पाहावं लागलं. बीसीसीआय टीव्हीवर पोस्ट केलेल्या एका व्हिडीओत अर्शदीप सिंग म्हणाला की, ‘पहिला डाव संपल्यानंतर माझं मोहम्मद सिराजबरोबर याबाबत बोलणं झालं होतं. तेव्हा त्याने सांगितलं होतं की, या धावा खूप महत्त्वाच्या आहेत. मला ते आता काही वाटत नाही. पण सामन्याच्या संदर्भात या धावा खूपच महत्त्वाच्या होत्या. जर तुम्ही सामन्यानंतर पाहिलं तर त्या धावाच गेम चेंजर होत्या.’