Home महाराष्ट्र कोकण Mumbai to Sindhudurg Flight : अवघ्या 70 मिनिटांत मुंबई ते थेट सिंधुदुर्ग! कोकणवासीयांचा प्रवास होणार सुसाट, आजपासून विमानसेवा सुरू

Mumbai to Sindhudurg Flight : अवघ्या 70 मिनिटांत मुंबई ते थेट सिंधुदुर्ग! कोकणवासीयांचा प्रवास होणार सुसाट, आजपासून विमानसेवा सुरू

0
Mumbai to Sindhudurg Flight : अवघ्या 70 मिनिटांत मुंबई ते थेट सिंधुदुर्ग! कोकणवासीयांचा प्रवास होणार सुसाट, आजपासून विमानसेवा सुरू
Photo : Video Grab

 Mumbai to Sindhudurg Flight : तळकोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. नवी मुंबई ते सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळादरम्यान आजपासून नियमित विमानसेवा सुरू होत आहे. फ्लाय 91 कंपनीकडून ही सेवा चालवली जाणार आहे. आतापर्यंत रस्ते किंवा रेल्वेने कोकणात जाण्यासाठी अनेक तासांचा प्रवास करावा लागत होता. मात्र, आता विमानाने हा प्रवास अवघ्या 1 तास 10 मिनिटांत पूर्ण करता येणार आहे.

https://www.prahaar.in/2026/11/15/india-vs-new-zealand-a-thrilling-victory-for-team-india-they-defeat-new-zealand-by-22-runs-to-win-the-odi-series-2/

या विमानसेवेमुळे कोकणवासीय, मुंबईत कामानिमित्त राहणारे चाकरमानी आणि पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पहिल्याच विमानप्रवासाचा अनुभव घेतलेल्या प्रवाशांनी आनंद व्यक्त केला. मात्र, ही सेवा नियमित सुरू राहावी आणि कोणत्याही कारणाने बंद पडू नये, अशी अपेक्षाही प्रवाशांनी व्यक्त केली आहे.

चिपी विमानतळासाठी महत्त्वाचे पाऊल

सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाचे उद्घाटन 9 ऑक्टोबर 2021 रोजी झाले होते. सुरुवातीला मुंबई-सिंधुदुर्ग मार्गावर अलायन्स एअरची विमानसेवा सुरू करण्यात आली होती. मात्र, ऑक्टोबर 2024 मध्ये ही सेवा बंद झाली. त्यानंतर फ्लाय 91 कंपनीकडून पुणे, बंगळुरू आणि हैदराबादसारख्या शहरांसाठी विमानसेवा सुरू करण्यात आली. आता नवी मुंबईशी थेट हवाई संपर्क सुरू झाल्यामुळे चिपी विमानतळाच्या वापराला आणखी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

नवी मुंबई-चिपी विमानसेवेचे वेळापत्रक आणि तिकीट दर

  • विमान कंपनी: फ्लाय 91
  • सेवा: आठवड्याचे सातही दिवस
  • नवी मुंबईहून उड्डाण: सकाळी 7.55 वाजता
  • चिपी विमानतळावर आगमन: सकाळी 9.05 वाजता
  • चिपीहून उड्डाण: सकाळी 9.25 वाजता
  • नवी मुंबईत आगमन: सकाळी 10.35 वाजता
  • प्रवासाचा कालावधी: 1 तास 10 मिनिटे
  • विमानाची प्रवासी क्षमता: 72
  • तिकीट दर: अंदाजे 3,500 ते 7,500 रुपये

तिकिटांचे दर प्रवासाची तारीख आणि मागणीनुसार बदलू शकतात.

पर्यटन आणि स्थानिक रोजगारालाही चालना मिळण्याची अपेक्षा

नवी मुंबई आणि सिंधुदुर्ग यांच्यातील थेट विमानसेवेमुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास अधिक सोयीचा होणार आहे. विशेषतः कमी वेळेत कोकणात पोहोचण्याची सुविधा मिळाल्याने पर्यटनालाही चालना मिळू शकते. पर्यटकांची संख्या वाढल्यास स्थानिक हॉटेल व्यवसाय, वाहतूक आणि इतर पर्यटनपूरक व्यवसायांनाही फायदा होण्याची अपेक्षा आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here