Home ताज्या घडामोडी Amitabh Bachchan News: अमिताभ बच्चन यांच्या जलसाबाहेरील गोळीबाराचा कट पोलिसानांनी उधळला; दोघांना अटक

Amitabh Bachchan News: अमिताभ बच्चन यांच्या जलसाबाहेरील गोळीबाराचा कट पोलिसानांनी उधळला; दोघांना अटक

0
Amitabh Bachchan News: अमिताभ बच्चन यांच्या जलसाबाहेरील गोळीबाराचा कट पोलिसानांनी उधळला; दोघांना अटक

Amitabh Bachchan News: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या मुंबईतील जुहू येथील ‘जलसा’ या निवासस्थानाबाहेर गोळीबार करण्याचा कट आखण्यात आला होता. मात्र, दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने वेळीच कारवाई करत हा कट उधळून लावला आहे. या प्रकरणात पोलिसांनी दिल्ली आणि मुंबईतून दोघांना अटक केली आहे.

लॉरेन्स बिश्नोई टोळीतील दोन शूटरना शनिवारी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. अटक केलेल्या 2 शूटरपैकी एक जालंधरचा रहिवासी विकास ठाकूर उर्फ ​​विकी तर दुसरा पंजाबमधील तरनतारनचा रहिवासी दीपक सिंग उर्फ ​​दीप हे आहेत. असे म्हंटले जाते की, 1984 च्या शीखविरोधी दंगलींबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे दिल्लीतील एक व्यावसायिक आणि बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यावर हल्ला करण्याची योजना या दोघांनी आखली होती. या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी विशेष पथकाने दिल्ली आणि मुंबईत तपासाची चक्रे वेगाने फिरवली. त्यामुळे या दोघांना त्वरित अटक करण्यात आले आहे.

https://www.prahaar.in/2026/11/15/during-the-visit-of-prince-william-and-kate-middleton-traffic-on-roads-in-south-mumbai-will-be-diverted-and-parking-will-be-prohibited/

दरम्यान, 15 आणि 16  नोव्हेंबरच्या मध्यरात्री अमिताभ बच्चन यांनी कोणताही संदर्भ न देता सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये, ” बच गये (वाचलो)” असे लिहिले.

याआधी ३ बॉम्बच्या धमक्या

अलीकडेच मागच्या महिन्यात अमिताभ बच्चन यांना ईमेलद्वारे तीन बॉम्ब हल्ल्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. पहिली धमकी 23 ऑक्टोबर रोजी आली होती, ज्यात महापौर रितू तावडे यांच्या कार्यालयावर आणि अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ निवासस्थानी हल्ला करण्याचा इशारा देण्यात आला होता.

दुसरा धमकीचा ईमेल 6 नोव्हेंबर रोजी आला, ज्यात जलसा, मुंबई उच्च न्यायालय आणि बीएसई यांना लक्ष्य करण्यात आले होते. ‘खलिस्तान’चा उल्लेख असलेल्या या ईमेलमध्ये, 27 नोव्हेंबर रोजी महालक्ष्मी रेसकोर्स परिसरात गायक दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टदरम्यान हल्ला होईल, असा दावाही करण्यात आला आहे.

तिसरा धमकीचा मेल 12 नोव्हेंबर रोजी जलसा , मुंबई विमानतळ, महापौरांचे कार्यालय आणि अनेक बँकांना लक्ष्य करण्यात आले होते. या तिन्ही ईमेलपैकी कोणत्याही ईमेलमध्ये नमूद केलेल्या दोन्ही ठिकाणी केलेल्या झडतीदरम्यान काहीही संशयास्पद आढळले नाही.

मात्र मुंबई पोलिसांनी, या खबरदारी म्हणून अमिताभ बच्चन यांची सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे. अतिरिक्त पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तसेच बच्चन यांच्या जुहू येथील ‘जलसा’ या बंगल्याबाहेर बॅरिकेड्स देखील लावण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here