न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली आहे. भारतीय संघाचा अनुभवी सलामीवीर रोहित शर्माला मॅथ्यू फिशरने अवघ्या 7 धावांवर बाद केले, त्यानंतर स्टार फलंदाज विराट कोहलीही ५ धावा करून माघारी परतला. त्यानंतर जेकब डफीने ऋतुराज गायकवाडला बाद केल्यामुळे भारतीय संघ अडचणीत सापडला होता. सध्या श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल ही जोडी डाव सावरून संघाला संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. मागच्या सामन्यात रोहित आणि विराटला खातेही खोलता आलं नव्हतं. पाचवा वनडे सामना भारताने गमावला तर मालिका 2-2 ने बरोबरीत सुटेल. त्यामुळे मालिका विजयासाठी भारताला हा सामना जिंकणं भाग आहे. भारताने शेवटच्या 2017/18 मधील दक्षिण आफ्रिका दौऱ्यात 4 किंवा त्याहून अधिक सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत एकदाही 50 पेक्षा जास्त धावांची सलामीची भागीदारी केली नव्हती. त्या मालिकेत 6 डावांत एकूण 146 धावा केल्या गेल्या होत्या आणि सर्वोच्च सलामीची धावसंख्या 48 होती.
या मालिकेत भारतीय टॉप-ऑर्डरने एकत्रितपणे केवळ 176 धावा केल्या आहेत. त्यांची सरासरी 14.66 वर तर स्ट्राइक रेट 82.24 वर घसरला आहे. संपूर्ण मालिकेत टॉप-3 मधून फक्त एकदाच अर्धशतक पाहायला मिळाले.आश्चर्याची गोष्ट म्हणजे हेच फलंदाज गेल्या महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध मात्र जबरदस्त फॉर्ममध्ये होते. त्या मालिकेतील तीन सामन्यांत त्यांनी 103.85 च्या सरासरीने 727 धावा केल्या होत्या. त्यात चार शतके आणि एक अर्धशतकही होते.वेस्ट इंडिजविरुद्ध धावांचा पाऊस पाडणारे हेच खेळाडू न्यूझीलंडच्या परिस्थितीत मात्र पूर्णपणे अपयशी ठरले आहेत.2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतरचा विक्रम पाहिला तर चार किंवा त्यापेक्षा जास्त सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारताच्या टॉप-3 मधील एकाही फलंदाजाला शतक करता न येण्याची घटना याआधी फक्त एकदाच घडली होती. तीही 2013 नंतरच्या न्यूझीलंड दौऱ्यातच घडली होती. आता पुन्हा एकदा न्यूझीलंडमध्येच हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे परदेशी दौऱ्यावर, विशेषतः न्यूझीलंडमध्ये भारतीय फलंदाजीला नेहमीच अडचण का येते, हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
https://www.prahaar.in/2026/11/14/u19-asia-cup-2026-india-down-8-wicket-on-252-needing-86-more-runs-heres-how-they-defeated-pakistan-with-51-balls-to-spare/
विराट कोहलीने द्विपक्षीय एकदिवसीय मालिकेत सलग तीन वेळा एकेरी धावसंख्या नोंदवण्याची ही केवळ दुसरीच वेळ आहे. यापूर्वी 2012/13 च्या पाकिस्तानविरुद्धच्या घरच्या मालिकेत अशी वेळ आली होती, ज्यामध्ये त्याने तीन डावांत अनुक्रमे 0, 6 आणि 7 धावा केल्या होत्या.
एका एकदिवसीय (ODI) मालिकेत विराट कोहली सर्वाधिक वेळा एकेरी धावसंख्येवर बाद होण्याचे विक्रम:
3 – विश्वचषक (World Cup), 2011
3 – पाकिस्तानचा भारत दौरा, 2012/13
3 – कार्लटन मिड एकदिवसीय तिरंगी मालिका (Carlton Mid ODI Tri-Series), 2014/ 15 (ऑस्ट्रेलिया)
3 – भारताचा न्यूझीलंड दौरा, 2026