Home ताज्या घडामोडी Sion Hospital: महापालिकेच्या शीव रुग्णालयात अतिरिक्त ड्युअल एनर्जी सी.टी.स्कॅनची सुविधा

Sion Hospital: महापालिकेच्या शीव रुग्णालयात अतिरिक्त ड्युअल एनर्जी सी.टी.स्कॅनची सुविधा

0
Sion Hospital: महापालिकेच्या शीव रुग्णालयात अतिरिक्त ड्युअल एनर्जी सी.टी.स्कॅनची सुविधा

मुंबई (विशेष प्रतिनिधी): रुग्णांच्या आजारांसाठी तसेच विविध रोगांचे निदान करण्यासाठी डयुअल एनर्जी सी.टी. स्कॅनचा वापर करण्यात येत असून महापालिकेच्या शीव रुग्णालयातील याबाबतची सुविधा कमी पडत असल्याने आता याठिकाणी अतिरिक्त डयुअल एनर्जी सी.टी.स्कॅनची सुविधा निर्माण केली जाणार आहे. मात्र, ही सुविधा आता खासगी सहभाग अर्थात पीपीपी तत्वावर केली जाणार आहे. ऍड ऍनेक्स हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली आहे. प्रथम पाच आणि त्यानंतर पाच अशाप्रकारे दहा वर्षांच्या कालावधीसाठी रेडीओलॉजी केंद्रासाठी रॉयल्टी म्हणून प्रत्येक महिन्याला 2.70 लाख रुपये एवढे शुल्क आकारले जाणार आहे.

https://www.prahaar.in/2026/11/15/rajasthan-railway-track-blast-two-individuals-involved-in-a-plot-to-blow-up-a-railway-track-in-rajasthan-arrested-from-punjab/

मुंबई महापालिकेचे शीव रुग्णालय अर्थात लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय मुंबईतील महानगरपालिकेचे प्रमुख रुग्णालय आहे. या रुग्णालयाजवळच आशिया खंडातील सर्वात मोठी व दाट धारावी झोपडपट्टी आहे. या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या आजारासाठी तथा अपघातामध्ये विविध रोगांचे निदान खात्री करण्यासाठी ड्युअल एनर्जी सी.टी. स्कॅन या सुविधा अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे रुग्णांना या सुविधेकरिता प्रतिक्षा करावी लागते. एवढ्या लोकांना सुविधा देण्यासाठी महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये अतिरिक्त ड्युअल एनर्जी सी.टी. स्कॅन मशीन सुरू करावी लागेल व त्यासाठी महानगरपालिकेला मोठया प्रमाणावर निधी खर्च करावा लागेल. तसेच वैद्यकीय उपकरणे ही चालविण्यासाठी आवश्यक ते डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचारी वर्ग यांची नेमणूक करावी लागेल. त्यांच्या आस्थापनेसाठी कायम स्वरुपी खर्च करावा लागेल. त्यावरील उपाय म्हणून सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय ड्युअल एनर्जी सी.टी. स्कॅन सेवा महानगरपालिकेने निश्चित केलेल्या व महानगरपालिका रुग्णांना सध्या लागू असलेल्या दराने सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. महानगरपालिकेला त्यासाठी आवश्यक ते डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचारी वर्ग यांची नेमणूक करावी लागणार नाही.

त्यामुळे महानगरपालिकेच्या शीव रुग्णालयात 62.68 चौ. मीटर क्षेत्रफळात डयुअल एनर्जी सी.टी. स्कॅन सेवा सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर दिली जाणार आहे. त्यामुळे शीव रुग्णालयात स्वखर्चाने ही यंत्रणा उभारली जाणार आहे आणि पुढील देखभाल व दुरुस्तीही संबंधित संस्था करणार आहे. मात्र, या सेवा देण्यासाठी आवश्यक डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचारी यांची नेमणूक संस्थाच करेल आणि रुग्णांना ड्युअल एनर्जी सी.टी. स्कॅन या सेवांसाठी मागवलेल्या निविदेमध्ये ऍड ऍनेक्स हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पात्र ठरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here