Home महाराष्ट्र नाशिक Nashik : दिवाळीनंतर नाशिकमध्ये कचऱ्याचा डोंगर ! 15 दिवसांत तब्बल 13 हजार 538 टन कचरा जमा

Nashik : दिवाळीनंतर नाशिकमध्ये कचऱ्याचा डोंगर ! 15 दिवसांत तब्बल 13 हजार 538 टन कचरा जमा

0
Nashik : दिवाळीनंतर नाशिकमध्ये कचऱ्याचा डोंगर ! 15 दिवसांत तब्बल 13 हजार 538 टन कचरा जमा

नाशिक : दिवाळी सणाच्या काळात बाजारपेठांमधील वाढलेली खरेदी-विक्री, व्यावसायिक उलाढाल आणि घराघरांत झालेल्या साफसफाईमुळे नाशिक शहरात मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण झाला आहे. महापालिकेच्या घनकचरा संकलनाच्या आकडेवारीनुसार, अवघ्या १५ दिवसांत शहरातून तब्बल १३ हजार ५३८ टन कचरा जमा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ४ नोव्हेंबर रोजी एका दिवसात सर्वाधिक ९६६ टन कचरा संकलित झाला. दरम्यान, दिवाळीनंतर शहरातील अनेक निवासी भागांमध्ये स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला असून दुर्गंधी आणि डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिक हैराण झाले आहेत.

१५ दिवसांत १३ हजार टनांहून अधिक कचरा जमा

महापालिकेच्या २८ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर या कालावधीतील आकडेवारीनुसार, शहरात एकूण १३ हजार ५३८ टन कचरा संकलित करण्यात आला. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा, व्यावसायिक आस्थापने आणि निवासी भागांतून मोठ्या प्रमाणात कचरा बाहेर पडल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

२८ ऑक्टोबर रोजी ९२३ टन कचरा जमा झाला होता. त्यानंतर २९ ऑक्टोबरला ८९६ टन, ३० ऑक्टोबरला ८९२ टन आणि ३१ ऑक्टोबरला ८८९ टन कचऱ्याची नोंद करण्यात आली. नोव्हेंबरच्या सुरुवातीला कचऱ्याच्या प्रमाणात पुन्हा वाढ झाली. २ नोव्हेंबर रोजी ९६१ टन, तर ४ नोव्हेंबर रोजी सर्वाधिक ९६६ टन कचरा संकलित करण्यात आला. ५ नोव्हेंबर रोजीही ९५१ टन कचरा जमा झाला होता.

https://www.prahaar.in/2026/11/14/jalgaon-earthquake-earthquake-tremors-in-jalgaon-district-several-talukas-including-raver-shaken-atmosphere-of-fear-among-citizens/

११ नोव्हेंबरला कचरा संकलनात अचानक घट

दिवाळीनंतरच्या काळात कचरा संकलनाच्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळाले. ८ नोव्हेंबर रोजी ८७३ टन, ९ नोव्हेंबरला ८४२ टन आणि १० नोव्हेंबर रोजी पुन्हा वाढ होऊन ९१७ टन कचरा संकलित करण्यात आला. मात्र, ११ नोव्हेंबर रोजी कचरा संकलनाचे प्रमाण अचानक कमी होऊन ७६२ टनांवर आले. सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होत असताना संकलनातील ही घट लक्षवेधी ठरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here