Home क्रीडा IND vs NZ 5th ODI: रोहित शर्माकडे शेवटची संधी! न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेनंतर पुढचं काय ते ठरणार?

IND vs NZ 5th ODI: रोहित शर्माकडे शेवटची संधी! न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेनंतर पुढचं काय ते ठरणार?

0
IND vs NZ 5th ODI: रोहित शर्माकडे शेवटची संधी! न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेनंतर पुढचं काय ते ठरणार?
IND vs NZ 5th ODI: रोहित शर्माकडे शेवटची संधी! न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेनंतर पुढचं काय ते ठरणार? (Photo: ANI)

भारत न्यूझीलंड वनडे मालिकेतील शेवटचा सामना 15 नोव्हेंबरला होणार आहे. हा सामना खऱ्या अर्थाने रोहित शर्मासाठी महत्त्वाचा आहे. इंग्लंड दौऱ्यात अशीच काहिशी स्थिती रोहित शर्माची झाली होती. मात्र लॉर्ड्सवर शतक ठोकलं आणि त्या चर्चांना पूर्णविराम लागला. त्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत रोहित शर्माची बॅट तळपली. त्यामुळे रोहित शर्मा फॉर्मात असल्याचं दिसून आलं. पण न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत त्याच्या फलंदाजीला ग्रहण लागल्याचं दिसून आलं. पहिल्या वनडे सामन्यात 0, दुसऱ्या वनडे सामन्यात 23 आणि चौथ्या वनडे सामन्यात पुन्हा एकदा शून्यावर बाद झाला. आतापर्यंत खेळलेल्या तीन सामन्यात त्याची बॅट शांत होती. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत त्याला शतक ठोकून आपली छाप सोडता आली नाही. त्यामुळे आता त्याच्याकडे शेवटची संधी आहे. पाचव्या वनडे सामन्यात शतकी खेळी करून वनडे वर्ल्डकपसाठी आपला दावा पक्का करण्याची ही संधी असणा आहे.

रोहित शर्माची न्यूझीलंडमधील निराशाजनक कामगिरी

रोहित शर्माचा न्यूझीलंडमधील रेकॉर्ड काही चांगला नाही. आतापर्यंत त्याने जगभरात अनेक धावा आणि विक्रम रचले. मात्र न्यूझीलंडमध्ये त्याची बॅट कायम शांत राहिली आहे. न्यूझीलंडच्या भूमीत त्याला एकही शतक ठोकता आलेलं नाही. न्यूझीलंडमध्ये रोहित शर्माने आतापर्यंत 18 वनडे सामने खेळले असून 460 धावा केल्या आहे. यात चार अर्धशतकांचा समावेश आहे. न्यूझीलंडविरुद्ध रोहित शर्माने शतकं ठोकलंच नाही, असं अजिबात नाही. त्याने न्यूझीलंडविरुद्ध दोन शतकं ठोकली आहेत. पण ही शतकं न्यूझीलंडच्या भूमीत नाहीत, तर इतर ठिकाणी आहेत. या मालिकेत रोहित शर्माला शतक सोडा, अर्धशतक करणंही कठीण झालं आहे.

https://www.prahaar.in/2026/11/14/ind-vs-nz-5th-odi-live-streaming-when-and-where-to-watch-the-fifth-odi-match-between-india-and-new-zealand-find-out-here/

रोहित शर्माचा शेवटचा न्यूझीलंड दौरा

रोहित शर्मा वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेपर्यंत खेळेल, असा क्रीडाप्रेमी आणि तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्यामुळे रोहित शर्मासाठी हा शेवटचा न्यूझीलंड दौरा असणार आहे. कारण यानंतर होणाऱ्या न्यूझीलंड दौऱ्यात रोहित शर्मा नसेल, हे नक्की आहे. त्यामुळे न्यूझीलंडमध्ये शतक ठोकण्याची त्याच्यासाठी शेवटची संधी आहे. पाचव्या वनडे सामन्यात शतकी खेळी करण्यापासून चुकला तर ही त्याला परत कधीच मिळणार नाही. त्यामुळे रोहित शर्माच्या कामगिरीकडे क्रीडाप्रेमींच्या आणि त्याच्या चाहत्यांचा नजरा लागून आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here