Home महत्वाची बातमी मध्य रेल्वेच्या सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या नुतनीकरणाचा मार्ग मोकळा; तब्बल ५६ झाडे कापण्यास आणि ७२ झाडे पुनर्रोपित करण्यास वृक्ष प्राधिकरणाची मंजुरी

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या नुतनीकरणाचा मार्ग मोकळा; तब्बल ५६ झाडे कापण्यास आणि ७२ झाडे पुनर्रोपित करण्यास वृक्ष प्राधिकरणाची मंजुरी

0
मध्य रेल्वेच्या सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या नुतनीकरणाचा मार्ग मोकळा; तब्बल ५६ झाडे कापण्यास आणि ७२ झाडे पुनर्रोपित करण्यास वृक्ष प्राधिकरणाची मंजुरी
मध्य रेल्वेच्या सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या नुतनीकरणाचा मार्ग मोकळा (Photo: ANI)

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात सीएसएमटी स्थानकाचे नुतनीकरण करण्यात येत असून या नुतनीकरणाच्या पुनर्बांधकामामध्ये तब्बल १२८ झाडे बाधित होत आहे. यामध्ये ५६ झाडे कापली जाणार आहे. तर ७२ झाडे पुनर्रोपित करण्यात येणार आहे. ही झाडे कापण्यास आणि पुनर्रोपित करण्यास वृक्ष प्राधिकरणाने मंजुरी दिली. त्यामुळे आता सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या पुनर्बांधकामाचा मार्ग खुला झाला आहे.

मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकाचे नुतनीकरण करण्यात येत असून ५६ वृक्ष कापण्यास व ७२ वृक्ष पुनर्रोपित करण्यास अशाप्रकारे एकूण १२८ वृक्ष बाधित होत आहे.

https://www.prahaar.in/2026/11/14/mumbai-municipal-corporations-emergency-control-room-now-has-a-sharper-more-vigilant-eye/

यापूर्वी ८६ झाडे कापणे, १८० झाडे पुनर्रोपित करणे व २५६ (दोनशे छप्पन) झाडे आहे तशीच राखणे बाबत परवानगी देण्यात आलेली आहे. आहे तशीच राखण्यात आलेल्या २५६ झाडांपैकी १४ झाडे सदर भूभागावर अस्तित्वात नाहीत. त्यानुसार, या जागेवर आहे तशीच राखण्यात आलेली एकूण २४२ झाडे आता अस्तित्वात आहेत, रेल्वेच्यावतीने सादर केलेला संमत आराखडा व स्थळपाहणी नुसार, त्यापैकी १२८ झाडे ही वृक्ष अभियांत्रिकी खरेदी आणि बांधकामात (EPC) बाधित होत आहेत. त्यामुळे यातील ५ झाडे कापण्यास आणि ७२ पुनर्रोपित करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाला सादर करण्यात आला होता.

या ५६ वृक्ष कापण्याच्या व ७२ वृक्ष पुनर्रोपित करण्याच्या बदल्यात नवीन २४६३ लावण्यात येणारी वृक्ष ही तोडण्यात आल्याच्या दिनांकापासन १५ दिवसांत लावण्यात येणार आहेत. पुनर्रोपित करण्यात येणारी ७२ वृक्ष तसेच कापण्यात येणाऱ्या झाडांच्या मोबदल्यात भरपाई म्हणून, २४६३ वृक्ष हे ठाकुर्ली पूर्व येथील आरपीएफ बॅरेक येथील भूभागावरील १४,२०२ चौरस मीटर इतक्या क्षेत्रावर तसेच दिघा मोग्लिचे डॅम येथील ११,४३१ चौ. मी. क्षेत्रावर असे एकूण २५,६३३ चौरस मीटर क्षेत्रावर, पारंपारिक पध्दतीने वृक्षारोपण करण्यात येणार आहे. नवीन लावण्यात आलेल्या झाडांचे ०७ वर्षापर्यंत जतन व संवर्धन संबंधित विकासक यांच्यामार्फत करण्यात येईल, असे त्यांनी हमीपत्रात नमुद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here