मुंबई: कांजुरमार्ग रेल्वे स्थानकाजवळ सिग्नलिंग आणि दूरसंचार (S&T) यंत्रणेमध्ये बिघाड झाल्यामुळे गेल्या महिन्यामध्ये मध्य रेल्वेची संपूर्ण दिवसभरासाठी वाहतूक विस्कळीत झालेली होती. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी अनेक नोकरदारांना रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याचा मनस्ताप करावा लागला होता. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नोकरदारांना लेट मार्कचा फटका बसला होता. 26 ऑक्टोबर, सोमवारी झालेला बिघाड नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला होता, याचं कारण आता स्पष्ट झालं आहे. अद्याप रेल्वेकडून ह्याचं अधिकृत कारण स्पष्ट करण्यात आलेलं नसून शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे.
https://www.prahaar.in/2026/11/13/union-minister-ramdas-athawale-big-decision-for-drought-affected-farmers-to-donate-one-month-salary-2-lakh-to-cm-relief-fund/
नेमकं कारण काय?
मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवा बहुतांश वेळा विस्कळीत झाल्या आहेत. वाहतूक विस्कळीचे कारण अद्याप रेल्वेकडून अधिकृत रित्या जाहीर करण्यात आलेली नाही, प्राथमिक निष्कर्षाच्या आधारे भविष्यात अशा प्रकारची घटना टाळण्यासाठी रेल्वेने संबंधित उपकरणे सध्याच्या केबल टर्मिनेशन रॅकवरील ठिकाणाहून इतरत्र ठिकाणी हलविण्याचा विचार सुरू केला आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्युत प्रवाहाच्या उलट प्रवाहामुळे उपकरणात बिघाड झाल्याचा संशय आहे. शिवाय, हे प्राथमिक निष्कर्ष असून अधिकृत चौकशी अहवाल अद्याप अपेक्षित आहे. बिघाडामागील नेमके कारण तपास पूर्ण झाल्यावरच कळेल. दरम्यान, भविष्यात असा बिघाड होण्याचा धोका कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रेल्वे अधिकारी उपकरण स्थलांतरित करण्याच्या शक्यतेची तपासणी करत आहेत.
https://www.prahaar.in/2026/11/13/thane-water-cut-alert-24-hour-water-supply-shutdown-in-these-areas-on-monday-check-full-list/
26 ऑक्टोबर रोजी घडलेल्या घटनेमुळे मध्य रेल्वेच्या सिग्नलिंग यंत्रणेतील त्रुटी उघडपणे समोर आली आहे. कारण विक्रोळी आणि भांडुप स्थानकादरम्यान सिग्नल यंत्रणा बंद पडली होती. सिग्नलिंग प्रणाली अकार्यक्षम झाल्यामुळे, संपूर्ण ब्लॉक वर्किंग आणि प्राधिकरणाद्वारे वाहतूक यांसारख्या पर्यायी व्यवस्थांद्वारे रेल्वेची वाहतूक नियंत्रित करावी लागली. या बिघाडाचा फटका मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे या दोन्हीही मार्गांवरील वाहतुकीवर बसला, ज्यामुळे अनेक सेवा रद्द कराव्या लागल्या आणि संपूर्ण रेल्वे मार्गिकेवरील सेवांना विलंब झाला. प्रभावित मार्गावरील लोकल गाड्या अत्यंत संथगतीने धावत होत्या. त्यामुळे अनेक प्रवाशांना लोकलमध्ये बराच वेळ अडकून राहावे लागले. दिवसभर रेल्वे सेवा विलंबाने सुरू होती. सिग्नल यंत्रणा पूर्ववत करून रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यासाठी रेल्वेच्या तांत्रिक पथकांनी दिवसभर प्रयत्न केले.
https://www.prahaar.in/2026/11/13/cidco-has-appointed-a-consultant-to-obtain-environmental-clearance-for-the-35-km-long-mumbai-metro-line-8-which-will-connect-csmia-and-nmia/
या घटनेमुळे मुंबईच्या उपनगरीय रेल्वे वाहतुकीसाठी महत्त्वपूर्ण असलेली सिग्नल यंत्रणेचा कारभार पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. सिग्नल यंत्रणेतील एकाच ठिकाणचा बिघाडदेखील अनेक रेल्वे विभागांतील वाहतुकीवर साखळी परिणाम करू शकतो. तपास पूर्ण झाल्यानंतरच या बिघाडामागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान, भविष्यात अशा प्रकारचा बिघाड पुन्हा होऊ नये आणि संभाव्य धोका कमी व्हावा, यासाठी संबंधित उपकरणांचे स्थलांतर करण्याच्या पर्यायाची रेल्वे प्रशासनाकडून चाचपणी सुरू आहे.