Home Uncategorized Microsoft 365 ची सेवा पुन्हा रुळावर! Outlook सेवा पूर्ववत; जगभरातील युजर्सना मोठा दिलासा!

Microsoft 365 ची सेवा पुन्हा रुळावर! Outlook सेवा पूर्ववत; जगभरातील युजर्सना मोठा दिलासा!

0
Microsoft 365 ची सेवा पुन्हा रुळावर! Outlook सेवा पूर्ववत; जगभरातील युजर्सना मोठा दिलासा!
Microsoft 365 ची सेवा पुन्हा रुळावर! Outlook सेवा पूर्ववत; जगभरातील युजर्सना मोठा दिलासा! फोटो सौजन्य: सोशल मीडिया

मुंबई: नोकरदारांसाठी दिलासादायक बातमी आहे. गेल्या 18 तासांपासून बंद असलेलं मायक्रोसॉफ्ट आऊटलूक (Microsoft Outlook)ची सेवा पुर्वपदावर येत आहे. 18 तास चाललेल्या महा-आऊटेज (Outage) नंतर मायक्रोसॉफ्टची (Microsoft) यंत्रणा आणि सेवा आता हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. लोकप्रिय ई-मेल सेवा ‘आऊटलूक’ (Outlook) आता युजर्ससाठी पुन्हा सुरू झाली असून, रखडलेल्या ई- मेलच्या बॅकलॉग प्रक्रियेवर वेगाने काम केले जात आहे.

https://www.prahaar.in/2026/11/13/planning-a-trip-in-winter-these-6-places-in-india-are-perfect-for-tourism/

शुक्रवारी रात्री 11 वाजता जाहीर केलेल्या स्टेटस अपडेटमध्ये, मायक्रोसॉफ्टची क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडरने दिलेल्या माहितीनुसार, “आम्हाला सेवेच्या पुनर्प्राप्तीमध्ये अत्यंत सकारात्मक प्रगती दिसत असून, प्रभावित मायक्रोसॉफ्ट 365 पायाभूत सुविधांच्या मोठ्या भागात सेवा उपलब्धता आणि ई- मेल वितरण कामगिरी सुधारत आहे.” शुक्रवारी दिवसभर आऊटलूक पूर्णपणे बंद होते, परंतु रात्री 10 वाजण्याच्या सुमारास एशिया- पॅसिफिक क्षेत्रातील काही देशांमध्ये सेवा पूर्ववत करण्यात कंपनीला यश आले.

https://www.prahaar.in/2026/11/13/prime-minister-modi-inaugurates-the-countrys-first-led-dome-planetarium-in-mysuru/

या भीषण आऊटेजमुळे जगभरातील अनेक विविध संस्था आणि कार्यालयांचा शुक्रवारचा संपूर्ण दिवस विनाकारण वाया गेला. अनेक इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्या आणि सरकारी विभागांनी मायक्रोसॉफ्ट सेवा बंद असल्यामुळे ग्राहकांना कोणतीही मदत करू शकणार नाही, अशी माहिती सुद्धा त्यांनी दिली होती. दिवसभरात पाठवलेले नियोजित ई- मेल अनेक तास उशिरा आणि विस्कळीत स्वरूपात पोहोचल्याचे काही युजर्सचे म्हणणे आहे.

https://www.prahaar.in/2026/11/13/national-sports-awards-2025-maharashtra-shines-vidit-gujrathi-and-divya-deshmukh-receive-the-arjuna-award/

Backend मध्ये असलेल्या तांत्रिक कारणामुळे असलेले ग्लिचेस वेगाने साफ करणे हे आमचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे कंपनीने म्हटले आहे. विलंबाने येणाऱ्या संदेशांचे रक्षण करण्यासाठी आणि वितरण सुरळीत करण्यासाठी कंपनीने त्यांच्या ई-मेल टाइमआऊट विंडोमध्ये बदल करून ती 48 तासांपर्यंत वाढवली आहे. दरम्यान, या संपूर्ण घटनेमागे कोणतीही दुर्भावनापूर्ण किंवा हॅकिंगची कृती असल्याचा कोणताही पुरावा अद्याप मिळालेला नाही, असे मायक्रोसॉफ्टने स्पष्ट केले आहे. सर्व सेवा पूर्णपणे सुरळीत झाल्यानंतर या तांत्रिक बिघाडाचे मूळ कारण (Root Cause) आणि बचावात्मक उपायांचा सविस्तर अहवाल जाहीर केला जाईल, असे कंपनीने सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here