Home क्रीडा IND vs NZ 4th ODI: रोहित शर्मा आणि इशान किशनची चूक भारतीय संघाच्या अंगलट आली, 120 धावांचा फटका बसला Video

IND vs NZ 4th ODI: रोहित शर्मा आणि इशान किशनची चूक भारतीय संघाच्या अंगलट आली, 120 धावांचा फटका बसला Video

0
IND vs NZ 4th ODI: रोहित शर्मा आणि इशान किशनची चूक भारतीय संघाच्या अंगलट आली, 120 धावांचा फटका बसला Video
IND vs NZ 4th ODI: रोहित शर्मा आणि इशान किशनची चूक भारतीय संघाच्या अंगलट आली, 120 धावांचा फटका बसला Video (Photo: ANI)

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चौथा वनडे सामना माऊंट माऊगानुई येथे सुरू आहे. या सामन्यात भारताच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आणि धावांचा पाठलाग करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यातील दुसऱ्या षटकात रोहित शर्मा आणि विकेटकीपर इशान किशन यांनी एकापाठोपाठ एक चुका केल्या. त्याचा फटका टीम इंडियाला बसला. थोडं थोडका नाही तर 120 धावांचा भुर्दंड टीम इंडियाला भरावा लागला. कारण रोहित शर्मा आणि इशान किशनच्या गचाळ क्षेत्ररक्षणामुळे टीम इंडियाचं नुकसान झालं. या दोघांनी विल यंगचे दोन सोपे झेल सोडले. त्याचा फायदा विल यंगने पुढे घेतला. विल यंगला दोन जीवदान मिळाले तेव्हा तो 5 या वैयक्तिक धावसंख्येवर खेळत होता. त्यानंतर त्याने मिळालेल्या जीवदान पुरेपूर फायदा उचलला आणि आक्रमक फटकेबाजी केली. 49 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं आणि त्यानंतर आक्रमक बाणा कायम ठेवत 125 धावांपर्यंत मजल मारली.

आकिब नबीच्या षटकात दोन झेल सोडले

भारताकडून दुसरं षटक टाकण्यासाठी आकिब नबी आला होता. या षटकात गोलंदाजीचा सामना करणं न्यूझीलंडच्या गोलंदाजांना थोडं कठीण जाताना दिसलं. टिम सैफर्ट पहिल्या चेंडूवर धाव काढू शकला नाही. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चौकार मारला. तिसरा चेंडू त्याने नो बॉल टाकला त्यामुळे त्याला संधी मिळाली. त्याने फ्रि हिट चेंडूवर षटकार मारला. चौथ्या चेंडूवर त्याने एक धाव काढली आणि विल यंगला स्ट्राईक दिली. पाचव्या चेंडूवर त्याने विल यंगची विकेट काढली होती. पण रोहित शर्माने त्याचा सोपा झेल सोडला. त्यानंतर सहाव्या चेंडूवर पुन्हा एकदा विल यंगची विकेट काढण्याची संधी मिळाली. पण यावेळेस इशान किशनने चूक आणि सोपा झेल सोडला.

https://www.prahaar.in/2026/11/13/ind-vs-nz-4th-odi-india-scored-zero-runs-and-lost-three-wickets-in-the-very-first-over-rohit-and-virat-out-on-duck/

विल यंगची झुंजार खेळी

विल यंगला दोन जीवदान मिळाले आणि भारतीय संघ अडचणीत आला. विल यंग आणि टिम सैफर्ट या जोडीने पहिल्या विकेटसाठी 85 धावांची भागीदारी केली. टिम सैफर्टने यात 58 धावा केल्या आणि बाद झाला. त्यानंतर न्यूझीलंडचे धडाधड विकेट पडले. पण विल यंगने एका बाजूने किल्ला लढवला. त्याने 108 चेंडूत 14 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 125 धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे न्यूझीलंडने 50 षटकात सर्व गडी गमवून 333 धावा केल्या. या 333 धावांमध्ये 125 धावा या एकट्या विल यंगच्या आहे. जर 5 धावांवर असताना विकेट मिळाली असती तर भारताला विजयासाठी कमी धावा मिळाल्या असत्या. तसेच दबावही कमी असता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here