Home क्रीडा W,W,W..! पहिल्या षटकात भारताच्या शून्य धावा आणि तीन विकेट, असं पहिल्यांदाच घडलं आणि रोहित-विराटसोबत दुसऱ्यांदा

W,W,W..! पहिल्या षटकात भारताच्या शून्य धावा आणि तीन विकेट, असं पहिल्यांदाच घडलं आणि रोहित-विराटसोबत दुसऱ्यांदा

0
W,W,W..! पहिल्या षटकात भारताच्या शून्य धावा आणि तीन विकेट, असं पहिल्यांदाच घडलं आणि रोहित-विराटसोबत दुसऱ्यांदा
W,W,W..! पहिल्या षटकात भारताच्या शून्य धावा आणि तीन विकेट, रोहित-विराट आणि श्रेयस तंबूत (Photo: ANI)

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चौथा वनेड सामना बे ओव्हलच्या माऊंट माऊंगनाई येथे होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला. पण सर्व गणित हे न्यूझीलंडच्या बाजूने झुकलेलं दिसलं. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात सर्व गडी गमवून 333 धावा केल्या. तसेच विजयासाठी 334 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान भारतासाठी तसं कठीण होतं. त्यामुळे पहिल्या षटकापासून भारताला आक्रमक पवित्रा घेण्याशिवाय पर्याय नव्हता. पण पहिल्याच षटकात धावा गाठण्याचं स्वप्न मंदावलं. कारण पहिल्याच षटकात भारताला धडाधड तीन धक्के बसले. सलामीला आलेला रोहित शर्मा, त्यानंतर विराट कोहली आणि कर्णधार श्रेयस अय्यर हे तिघेही खातं न खोलता तंबूत परतले. त्यामुळे पहिल्या षटकात एकही धाव मिळाली नाही आणि तीन विकेट तंबूत होते. त्यामुळे पहिल्याच षटकात धावांचा पाठलाग करताना संघाची स्थिती नाजूक झाली होती.

पहिल्या षटकात काय घडलं?

न्यूझीलंडकडून पहिलं षटक टाकण्यासाठी मॅट हेनरी आला होता. त्याने या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर रोहित शर्माला तंबूचा रस्ता दाखवला. रोहित शर्माला गोल्डन डकवर बाद झाला. या मालिकेत शून्यावर बाद होण्याची रोहित शर्माची ही दुसरी वेळ आहे. त्यानंतर विराट कोहली फलंदाजीला आला आणि त्याने तीन चेंडू खेळून काढले. पण पाचव्या चेंडूवर मॅट हेनरीने त्याची विकेट काढली. त्यामुळे टीम इंडिया अडचणीत आली. कर्णधार श्रेयस अय्यरकडून अपेक्षा होती. मात्र श्रेयस अय्यर आणि पहिल्याच चेंडूवर पायचीत होऊन तंबूत परतला.

https://www.prahaar.in/2026/11/12/ind-vs-nz-4th-odi-live-streaming-where-and-when-can-you-watch-the-match-find-out-everything/

यापूर्वी असं कधी घडलं होतं?

वनडे सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघेही शून्यावर बाद होण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी अशीच घटना 2010 मध्ये दांबुला येथे श्रीलंकेविरुद्ध घडली होती. वनडे सामन्यांमध्ये एकही धाव न काढता पहिल्या तीन विकेट गमावणारे चार संघ आहे. यात पाकिस्तानवर अशी स्थिती दोन वेळा ओढावली आहे. वनडे वर्ल्डकप 1983 मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानने तीन विकेट गमावले होते. त्यानंतर 1997 मध्ये लाहोरमधील वनडे सामन्यात पाकिस्तानवर अशीच स्थिती ओढावली होती. तेव्हा दक्षिण अफ्रिकेने पहिल्याच षटकात तीन विकेट काढल्या होत्या. वनडे वर्ल्डकप 2003 मध्ये पीटरमारित्झबर्ग येथे रंगलेल्या सामन्यात श्रीलंकने बांगलादेशचे तीन विकेट पहिल्या षटकात काढले होते. अशीच स्थिती ऑस्ट्रेलियाची 2026 मध्ये झाली होती. मिरपूरमध्ये रंगलेल्या सामन्यात बांगलादेशने ऑस्ट्रेलियाचे तीन विकेट काढले होते. आता भारत न्यूझीलंड सामन्यात भारतावर अशी नामुष्की ओढावली आहे.

10 धावांच्या आत 4 विकेट गमवण्याची दुसरी वेळ

पहिल्या षटकात तीन विकेट गमवल्यानंतर ऋतुराज गायकवाडही फार काळ तग धरू शकला नाही. सहाव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर काइल जेमिसनने त्याची विकेट काढली. या सामन्यात फक्त 5 धावा करून बाद झाला. या विकेटसह वनडे सामन्यात 10 पेक्षा कमी धावांत पहिल्या चार विकेट गमावण्याची भारताची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 1983च्या विश्वचषक स्पर्धेत टुनब्रिज वेल्स येथे झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या सामन्यात भारताची 9 धावांवर 4 विकेट अशी स्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here