Home एक्सक्ल्युजिव्ह U19 Asia Cup 2026 अंतिम फेरीत भारत पाकिस्तान सामना, सेमीफायनलमध्ये टीम इंडियाने अफगाणिस्तानला नमवलं

U19 Asia Cup 2026 अंतिम फेरीत भारत पाकिस्तान सामना, सेमीफायनलमध्ये टीम इंडियाने अफगाणिस्तानला नमवलं

0
U19 Asia Cup 2026 अंतिम फेरीत भारत पाकिस्तान सामना, सेमीफायनलमध्ये टीम इंडियाने अफगाणिस्तानला नमवलं
U19 Asia Cup 2026 अंतिम फेरीत भारत पाकिस्तान सामना, सेमीफायनलमध्ये टीम इंडियाने अफगाणिस्तानला नमवलं (Photo: @ACCMedia1 Twitter)

अंडर 19 आशिया कप स्पर्धेच्या जेतेपदाच्या लढतीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. उपांत्य फेरीच्या लढतीत भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात लढत झाली. अफगाणिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. हा निर्णय भारताच्या पथ्यावर पडला असंच म्हणावं लागेल. अफगाणिस्तानकडून नोमन सालारझाई आणि शाह फैसल रहीमी या दोघांनी अर्धशतकी खेळी केली. त्याच्या या खेळीमुळेच अफगाणिस्तानला 227 धावांपर्यंत मजल मारता आली. अफगाणिस्तानने 50 षटकात 8 गडी गमवून 227 धावा केल्या आणि विजयासाठी 228 धावांचं आव्हान ठेवलं. हे आव्हान भारताने सहज गाठलं. भारताच्या सलामीच्या जोडीने 102 चेंडूत 117 धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे भारताचा विजय जवळपास निश्चित झाला. आर्यवीर सेहवाने 57 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकार मारत 51 धावांची खेळी केली. तर कर्णधार लक्ष्य रायचंदानी याने कर्णधारपदाला साजेशी कामगिरी केली. त्याने 90 चेंडूत 13 चौकार आणि 1 षटकार मारत 93 धावा केल्या.

लक्ष्य रायचंदानी याने व्हीके विनीतसोबत 77 धावांची भागीदारी केली. लक्ष्य रायचंदानी बाद झाल्यानंतर व्हीके विनीत याने डाव पुढे नेला. त्याने यशबर्धन चौहानसोबत विजयी भागीदारी केली. व्हीके विनीतने 62 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने नाबाद 57 धावा केल्या. तर यशबर्धन चौहानने 14 चेंडूत नाबाद 16 धावांची खेळी केली. भारताकडून इशान सूदने 3, आर्यन सावसानीने 2, काव्य पटेल 1, यशबर्धन चौहानने 1 आणि अर्जुन राजपूतने 1 विकेट काढली.

साखळी फेरीत काय घडलं होतं?

भारताने या विजयासह अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले भारत आणि पाकिस्तान यांच्यात जेतेपदासाठी लढत होणार आहे. यापूर्वी साखळी फेरीत भारत पाकिस्तान यांच्यात लढत झाली होती. या लढतीत पाकिस्तानने भारताला 3 गडी राखून पराभूत केलं होतं. भारताने 46.3 षटकात सर्व गडी गमवून 208 धावा केल्या होत्या. पाकिस्ताने हे आव्हान 7 गडी गमवून 48.1 षटकात पूर्ण केलं होतं. आता भारत पाकिस्तान हे दोन्ही संघ जेतेपदासाठी लढणार आहेत. अशा स्थितीत भारताकडे पराभवाचा वचपा काढण्याची संधी आहे.

https://www.prahaar.in/2026/11/12/u19-asia-cup-2026-pakistan-defeated-bangladesh-by-9-wickets-and-reached-the-final/

दोन्ही संघांची प्लेइंग 11

अफगाणिस्तान अंडर 19 (प्लेइंग इलेव्हन): अबिदुल्ला नादरजान, फरिदुल्ला इहसास, सुभान जाखाइल, नोमन सालारझाई (विकेटकीपर), शाह फैसल रहीमी, ताहिर सरवरी, अमीर हमजा, सोहेल खान (कर्णधार), मोहम्मद अली, बिलाल सलीमानखिल, नूर अली नियाझी.

भारत अंडर 19 (प्लेइंग इलेव्हन): लक्ष्य राजेश रायचंदानी (कर्णधार), आर्यवीर सेहवाग, व्हीके विनीत, अर्जुन राजपूत, यशवर्धन चौहान, अन्वय द्रविड (विकेटकीपर), मनल चौहान, मोहित उलवा, आर्यन सावसानी, काव्या पटेल, इशान सूद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here