भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील तीन सामन्यानंतर 2-0 अशी स्थिती आहे. तिसरा सामना पावसामुळे रद्द झाल्याने न्यूझीलंडची मालिका विजयाची संधी हुकली आहे. त्यामुळे आता करो या मरोची स्थिती आहे. दुसरीकडे, भारताने उर्वरित दोन पैकी एका सामन्यात विजय मिळवला तर मालिका खिशात घालेल. त्यामुळे चौथ्या वनडे सामन्याचं महत्त्व वाढलं आहे. दरम्यान, शुभमन गिलसह तीन खेळाडू चौथ्या आणि पाचव्या वनडे सामन्यात खेळणार नाहीत. त्यामुळे श्रेयस अय्यरच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी आहे. इतकंच काय मालिका विजयाचा दबावही असणार आहे. अशा स्थितीत चौथा वनडे सामना होत आहे आणि या सामन्यात काय होतं याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चौथा वनडे सामना 13 नोव्हेंबर रोजी ओव्हलच्या माउंट माउंगानुई येथे होत आहे.
गोलंदाजांना मदत करणारी खेळपट्टी
टी20 सामन्यांच्या तुलनेत एकदिवसीय मालिका खूपच वेगळी ठरली आहे. टी20 सामन्यांमध्ये खेळपट्ट्या सपाट होत्या, त्यामुळे फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यास मदत झाली होती. तर गोलंदाजांना टी20 मालिकेत विकेट आणि धावा वाचवण्यासाठी खूपच घाम गाळावा लागला.. मात्र, वनडे सामन्यांमध्ये हे चित्र वेगळं आहे. वनडेत गोलंदाजांना खेळपट्टीची मदत होत आहे. चेंडू स्विंग, सीम आणि बाऊन्स होत आहे, त्यामुळे त्याचा सामना करणं कठीण जात आहे. एकदा चेंडूची सुरुवातीची हालचाल स्थिरावली की, खेळपट्टी साधारणपणे फलंदाजीसाठी अनुकूल असेल.भारताने या मैदानावर तीन एकदिवसीय सामने खेळले असून, त्यापैकी 2019 मध्ये दोन जिंकले, तर 2020 मध्ये तिसरा सामना गमावला.
भारत विरुद्ध न्यूझीलंड चौथा एकदिवसीय सामना केव्हा आणि कुठे होणार ?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना शुक्रवार, 13 नोव्हेंबर रोजी माउंट माउंगानुई येथील बे ओव्हलवर खेळला जाईल.
https://www.prahaar.in/2026/11/12/ruturaj-gaikwad-will-open-the-batting-alongside-rohit-sharma-in-the-fourth-odi-against-new-zealand-says-media-report/
भारत विरुद्ध न्यूझीलंड चौथा वनडे सामना किती वाजता सुरू होईल?
सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 7:30 वाजता सुरू होणार असून, नाणेफेक सकाळी 7:00 वाजता होईल.
भारत विरुद्ध न्यूझीलंड चौथा वनडे सामना कोणत्या टीव्ही चॅनलवर प्रसारित होईल?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चौथा एकदिवसीय सामना भारतात सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनल्सवर थेट प्रक्षेपित केला जाईल.
भारतातील चाहते भारत विरुद्ध न्यूझीलंड चौथा एकदिवसीय सामना ऑनलाइन कसा पाहू शकतात?
भारतातील चाहते भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी लिव्ह ॲप आणि वेबसाइटवर पाहू शकतात .
न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या आणि पाचव्या एकदिवसीय सामन्यासाठी भारताचा संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार) , रोहित शर्मा, विराट कोहली, तिलक वर्मा, इशान किशन (विकेटकीपर), अक्षर पटेल, नमन धीर, औकिब नबी, गुरनूर ब्रार, रुतुराज गायकवाड, अर्शदीप सिंग, कुमार कुशाग्र (विकेटकीपर), मोहम्मद सिराज, यश ठाकूर, कुलदीप यादव.
भारताचा संभाव्य प्लेइंग 11: रोहित शर्मा, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, श्रेयस अय्यर (कर्णधार), अक्षर पटेल, इशान किशन (विकेटकीपर), नमन धीर, मोहम्मद सिराज, औकिब नबी, गुरनूर ब्रार, अर्शदीप सिंग.