Bus Driver Reel : सोशल मीडियावर झटपट प्रसिद्धी मिळवण्याच्या आणि लाइक्स-व्ह्यूजच्या नादात लोक आता स्वतःचाच नव्हे तर निष्पाप लोकांचा जीव धोक्यात घालायलाही मागेपुढे पाहत नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. सोशल मीडियावर सध्या एका बस चालकाचा असाच संतापजनक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक बस ड्रायव्हर प्रवाशांनी भरलेली चालती बस रस्त्यावर सोडून खाली उतरतो आणि गाडीच्या बाजूने डान्स करत रील बनवताना दिसतो. या प्रकारामुळे रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
https://www.prahaar.in/2026/11/12/free-bus-service-in-delhi-good-news-for-passengers-in-delhi-free-bus-service-from-november-to-january-the-government-is-preparing-to-take-a-major-decision-soon/
नेमकी घटना काय आहे?
व्हायरल होत असलेल्या या क्लिपमध्ये एक प्रवासी बस सुसाट वेगाने रस्त्यावरून जात असल्याचे दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, बसमध्ये प्रवासी बसलेले असतानाही चालकाने स्वतःच्या मनोरंजनासाठी आणि इन्स्टाग्रामवर रील बनवण्यासाठी चालत्या बसचे स्टेअरिंग सोडून बाहेर उडी मारली. बस चालू स्थितीत असताना हा चालक गाडीच्या बाजूने चालत डान्स करत स्टंट करत आहे. या बेजबाबदार प्रकारामुळे बसमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
View this post on Instagram
सोशल मीडियावर तीव्र संताप
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडिया वापरकर्त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. केवळ काही सेकंदांच्या प्रसिद्धीसाठी एवढा मोठा धोका पत्करणार्या या चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. एका युजरने संताप व्यक्त करत लिहिले की, “हे एकदा बघा! प्रवासी चालत्या बसमध्ये बसले आहेत आणि ड्रायव्हर बाहेर रील बनवत आहे! सर्वात धक्कादायक म्हणजे, प्रवाशांनाही या गोष्टीचे काही देणेघेणे नाहीये. आणि जर काही अनर्थ घडला, तर मग दोष कोणाला दिला जाईल? थेट सरकारला!” या घटनेने केवळ संबंधित चालकाच्या मानसिकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही, तर डिजिटल युगातील या भयंकर ‘रील क्रेझ’मुळे भविष्यात उद्भवणाऱ्या धोक्यांकडेही लक्ष वेधले आहे. निष्पाप प्रवाशांचा जीव धोक्यात घालून सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या अशा व्यक्तींवर वाहतूक पोलिसांनी आणि प्रशासनाने कठोर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी आता सर्वसामान्य नागरिकांमधून केली जात आहे.