Home ब्रेकिंग न्यूज Ashish Shelar : मुंबईत 5 हजार बालके कुपोषित; ही बाब अत्यंत शरमेची! ‘कुपोषणमुक्त मुंबई’साठी एसआरएने स्वतंत्र कार्यक्रम हाती घ्यावा

Ashish Shelar : मुंबईत 5 हजार बालके कुपोषित; ही बाब अत्यंत शरमेची! ‘कुपोषणमुक्त मुंबई’साठी एसआरएने स्वतंत्र कार्यक्रम हाती घ्यावा

0
Ashish Shelar : मुंबईत 5 हजार बालके कुपोषित; ही बाब अत्यंत शरमेची! ‘कुपोषणमुक्त मुंबई’साठी एसआरएने स्वतंत्र कार्यक्रम हाती घ्यावा
सांस्कृतिक कार्यमंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार (Photo: @ShelarAshish X)

मुंबई: मुंबईत मध्यम कुपोषित बालकांची संख्या 5 हजार असून ही बाब आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत शरमेची आहे, अशी स्पष्ट शब्दांत खंत व्यक्त करत मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी ‘कुपोषणमुक्त मुंबई’ अभियान राबवण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्यासह विविध विभागांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

एसआरएने हाती घ्यावा स्वतंत्र कार्यक्रम

ज्याप्रमाणे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (SRA) ‘झोपडपट्टीमुक्त मुंबई’ असा संकल्प केला आहे, त्याच धर्तीवर आता झोपडपट्ट्यांमध्ये असणारे कुपोषण रोखण्यासाठी एसआरएने ‘कुपोषणमुक्त मुंबई’ असा स्वतंत्र कार्यक्रम हाती घ्यावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. तसेच यासंदर्भातील सविस्तर कृती आराखडा येत्या पंधरा दिवसांत सादर करण्याचे आदेशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. एसआरए योजनांमधील झोपडपट्ट्यांमध्ये कुपोषित बालकांची संख्या कमी करण्याबरोबरच अंगणवाड्यांच्या जागेचा प्रश्नही कायमस्वरूपी सोडवावा, असे त्यांनी नमूद केले. यासाठी मुंबई महानगरपालिका, महिला व बालविकास विभाग आणि आरोग्य विभागाची मदत घ्यावी, असे सांगण्यात आले.

https://www.prahaar.in/2026/11/12/ashish-shelar-bhagwan-birsa-munda-gaurav-din-week-11-to-18-november-maharashtra-5-lakh-tree-plantation-mumbai-suburbs/

महापालिकेला दिलासादायक व कठोर निर्देश

ही गंभीर परिस्थिती बदलण्यासाठी मुंबई महापालिकेने सर्व संबंधित प्राधिकरणे आणि शासकीय यंत्रणांशी समन्वय साधून एक ठोस कृती आराखडा तयार करावा आणि महिन्याभरात अहवाल सादर करावा, असे निर्देश आशिष शेलार यांनी दिले. याशिवाय, दुष्काळी परिस्थितीमुळे मुंबईत स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबांसोबत येणाऱ्या बालकांची तातडीने नोंदणी करून त्यांना योग्य पोषण आहार आणि आवश्यक आरोग्य सेवा तात्काळ उपलब्ध करून द्याव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here