Home ताज्या घडामोडी Petrol Pump Viral Video: पेट्रोल पंपावर कमी पेट्रोल देण्याची नेमकी युक्ती काय? कर्मचाऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!

Petrol Pump Viral Video: पेट्रोल पंपावर कमी पेट्रोल देण्याची नेमकी युक्ती काय? कर्मचाऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!

0
Petrol Pump Viral Video: पेट्रोल पंपावर कमी पेट्रोल देण्याची नेमकी युक्ती काय? कर्मचाऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!

Petrol Pump Viral Video: अगदी खेड्यापाड्यांपासून ते शहरांपर्यंत सगळीकडे पेट्रोल पंप सर्रास आढळतात. दुचाकी, तीनचाकी, चारचाकी आणि अगदी दहाचाकी वाहनांचाही पेट्रोल पंपांशी थेट संबंध येतो. त्यामुळे, पेट्रोल पंपांवर आपली फसवणूक तर होत नाही, हे जाणून घेणे प्रत्येकासाठी उत्सुकतेचे असते. त्यामुळे आपण विविध ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने याबद्दल जाणून घेत असतो. याच समस्येबद्दल पेट्रोल पंपावरील एका कर्मचाऱ्याने व्हिडिओ बनवला जो सोशल मीडियावर आता व्हायरल होत आहे.

https://www.prahaar.in/2026/11/11/why-does-a-sister-give-a-coconut-to-her-brother-on-bhau-beej-what-is-the-religious-significance-and-belief-behind-this-tradition/

पेट्रोलचा वापर कमी कसा करायचा?
गुड्डू कश्यप हा जेबी पेट्रो फ्युएल्स नावाच्या पेट्रोल पंपावर काम करणारा या मुलाने त्याच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे की, अनेक लोकांनी त्याला पेट्रोल कमी कसे भरावे असे विचारले आहे. त्यावर त्याने अटेंडंट आधी ग्राहकाला जे 200, 500 किंवा 100 रुपये भरायचे असतात, तो आकडा मशीनमध्ये टाकतो आणि मग नोजल पाईप लावताना एक युक्ती करतो! जेव्हा नोझल पेट्रोल पंप मशीनवरील स्टँडवर ठेवले जाते, तेव्हा मीटर 0 दाखवतो किंवा बंद होतो. मात्र, जर नोझलच बंद असेल, तर ग्राहकाच्या वाहनात पेट्रोल कमी भरले जाण्याची शक्यता असते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Guddu kashyap (@i__am_guddu077)

मात्र, गुड्डू त्याच्या व्हिडिओमध्ये ही वस्तुस्थिती सिद्ध करू शकत नाही, तसेच पंप कर्मचारी पेट्रोल पंपाचे नोझल कमी कसे भरतात हे देखील तो पूर्णपणे स्पष्ट करत नाही. तथापि, लोकांना त्याचे म्हणणे अर्ध्यातर लोकांना पूर्णपणे समजलेले नाही आणि ते त्याच्याशी सहमत देखील नाहीत. तरीही, हा व्हिडिओ इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे आणि अनेक वापरकर्ते कमेंट्समध्ये या दाव्याची चौकशी करत आहेत. याआधी त्याने, पेट्रोल भरण्याची योग्य पद्धत आणि पेट्रोल पंपावर फक्त 0 दिसल्याने काहीही होत नाही, असे व्हिडिओ व्हायरल झाले होते, जे लोकांनी पाहिले आणि आपली मते व्यक्त केली.

गुड्डू कश्यपच्या व्हायरल व्हिडिओंवर, “तुम्हाला काय म्हणायचं आहे?” अशी प्रतिक्रिया वारंवार दिसत आहे. तसेच अनेक वापरकर्ते अजूनही व्हिडिओ पाहत आहेत आणि विचार करत आहेत की, “पेट्रोल पंप ऑपरेटर कमी पेट्रोल कसे काय देतात?”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here