Home ब्रेकिंग न्यूज मंत्री गणेश नाईक यांच्या शासकीय बंगल्याला आग; एसीमधील शॉर्ट सर्किटचा प्राथमिक अंदाज

मंत्री गणेश नाईक यांच्या शासकीय बंगल्याला आग; एसीमधील शॉर्ट सर्किटचा प्राथमिक अंदाज

0
मंत्री गणेश नाईक यांच्या शासकीय बंगल्याला आग; एसीमधील शॉर्ट सर्किटचा प्राथमिक अंदाज
मंत्री गणेश नाईक यांच्या शासकीय बंगल्याला आग

मुंबई: दिवाळीच्या सणात राज्यभरात विविध ठिकाणी आगीच्या दुर्घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशातच आता एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या ‘पावनगड’ या शासकीय बंगल्याला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुमारे 4 हजार चौरस फुटांच्या तळमजल्यावरील या बंगल्यात आग वेगाने पसरली होती. अग्निशमन दलाकडून दुपारी 1 वाजून 34 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार, या भीषण आगीमुळे बंगल्यातील वीजवाहिन्या, विद्युत उपकरणे, स्प्लिट एसी, स्वयंपाकघरातील साहित्य, कार्यालयीन फाइल्स, महत्त्वाची कागदपत्रे, लाकडी व स्टीलचे फर्निचर, फ्रिज आणि फॉल्स सिलिंगचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी आणि सुरक्षा रक्षकांनी सतर्कता दाखवत तात्काळ अग्निशमन दलाला याची सूचना दिली. माहिती कळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. सध्या आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांकडून अहोरात्र आणि शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

https://www.prahaar.in/2026/11/11/no-flights-from-mumbai-will-be-shifted-to-navi-mumbai-chief-minister-devendra-fadnavis-letter-sent-to-the-central-government-regarding-the-redevelopment-of-terminal-1/

दरम्यान, वनमंत्री कार्यालयाच्या विनंतीनुसार मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या मंत्रालयासमोरील ‘पावनगड’ या शासकीय बंगल्याला लागलेली आग आता पूर्णपणे आटोक्यात आली आहे. सुदैवाने या आगीच्या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळेच ही आग लागली का, याबाबतचा सखोल तपास पूर्ण झाल्यानंतरच आगीचे नेमके कारण स्पष्ट होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here