मुंबई: मुंबई- पुणे प्रवास अधिक जलद आणि सुखकर करण्याच्या दृष्टीने सरकारकडून विशेष पाऊलं उचलली जात आहेत. मुंबई- पुणे एक्स्प्रेसवे आणि अटल सेतू जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. 7.35 किमीचा उन्नत मार्गाचे काम 67 टक्के पूर्ण झाल्याची माहिती आहे. या मार्गामुळे नागरिकांच्या मुंबई- पुणे दरम्यानच्या वाहतुकीच्या वेळेमध्ये मोठी बचत होणार आहे. या प्रवासामुळे नागरिकांचे 90 मिनिटं वाचणार आहेत. या मार्गामुळे फक्त मुंबई- पुणे वाहतूकच मजबूत होणार नसून नवी मुंबई विमानतळ आणि जेएनपीटी बंदरची कनेक्टिव्हिटी सुद्धा अधिक मजबूत होणार आहे. सर्वच दृष्टीने हा प्रकल्प नागरिकांसाठी महत्त्वाचा प्रकल्प असेल.
https://www.prahaar.in/2026/11/11/fire-breaks-out-at-minister-ganesh-naik-official-bungalow-ac-short-circuit-suspected/
अटल सेतू आणि मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेसोबत जोडणाऱ्या प्रस्तावित 7.35 किमी एलिव्हेटेड मार्गाचे काम 67 टक्के पूर्ण झाले आहे. या प्रस्तावित मार्गामुळे मुंबई- पुणे दरम्यानची वाहतूक अधिक सुसाट होणार आहे. सरकारकडून मुंबई- पुणे वाहतूक आणखीन कशी जलद होईल, यादृष्टीने काम केले जात आहे. या प्रस्तावित मार्गामुळे मुंबई- पुणे दरम्यानची वाहतूक सुधारेल अशी अपेक्षा आहे. हा रस्ता चिरले- पालास्पे मार्गावरून जाणार आहे. अटल सेतू आणि मुंबई- पुणे एक्स्प्रेस हायवे यांच्यातील हा एलिव्हेटेड मार्ग थेट दुवा निर्माण होणार असून सरकारकडून हा मार्ह सहा पदरी केला जाणार आहे. लवकरच हा मार्ग प्रवाशांच्या सेवेमध्ये येण्याची अपेक्षा आहे.
https://www.prahaar.in/2026/11/11/mumbai-traffic-police-announced-traffic-restrictions-in-the-juhu-chowpatty-area-on-15th-november-and-16th-november-in-view-of-chhath-puja-please-check-the-information-regarding-alternative-routes-and/
हा मार्ग पूर्ण झाल्यावर दक्षिण मुंबई ते पुणे यांच्यातील प्रवास तब्बल दीड तासांनी कमी होणार आहे. या महत्त्वकांक्षी उन्नत मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. हा मार्ग केव्हापर्यंत प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल होणार? याची शक्यता अद्याप सरकारकडून वर्तवण्यात आलेली नाही. उन्नत मार्गामुळे वाहनचालकांना कायमच ट्रॉफिकमुळे गजबलेला पनवेल मुख्य जंक्शन बायपास करून थेट पुढे जाता येणार आहे. यामुळे नवी मुंबईतील वाहतूक कोंडी सुद्धा सुटण्यासाठी मोठी मदत होणार आहे. नवी मुंबई विमानतळ आणि जेएनपीए बंदराकडे जाणाऱ्या वाहतुकीला सुद्धा महत्त्वाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. इतकंच नाही तर, NH 48 आणि गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यांशीही हा रस्ता जोडला जाणार आहे.
https://www.prahaar.in/2026/11/11/no-flights-from-mumbai-will-be-shifted-to-navi-mumbai-chief-minister-devendra-fadnavis-letter-sent-to-the-central-government-regarding-the-redevelopment-of-terminal-1/
अनेक वेगवेगळ्या मार्गांना कनेक्टिव्हिटी होत असल्यामुळे वाहतुकदारांचा प्रवास अधिकच सुसाट होणार आहे. या एलिव्हेटेड मार्गामुळे NH 48 आणि NH 348 सोबतची महामार्ग जोडणी सुद्धा अधिक मजबूत होईल. सोबतच गोव्याकडे जाण्याचा मार्ग सुधारेल अशी अपेक्षा आहे. द्रुतगती मार्ग, बोगदे, मेट्रो कॉरिडॉर आणि मोक्याच्या रस्त्यांना प्रादेशिक वाहतुकीच्या नेटवर्कमध्ये आणण्यासाठी MMRDA च्या ‘Mumbai In 59 Minitues’ या व्यापक संकल्पनेचा हा एक भाग बनत आहे.