Home क्राईम Pune Crime News : पुण्यात जुन्या वादातून 17 वर्षीय मुलावर तलवारीने हल्ला; पाच अल्पवयीन मुलांसह सहा जण ताब्यात

Pune Crime News : पुण्यात जुन्या वादातून 17 वर्षीय मुलावर तलवारीने हल्ला; पाच अल्पवयीन मुलांसह सहा जण ताब्यात

0
Pune Crime News : पुण्यात जुन्या वादातून 17 वर्षीय मुलावर तलवारीने हल्ला; पाच अल्पवयीन मुलांसह सहा जण ताब्यात
पुण्यात जुन्या वादातून 17 वर्षीय मुलावर तलवारीने हल्ला; पाच अल्पवयीन मुलांसह सहा जण ताब्यात (Google Photo)

Pune Crime News: पुण्यात अल्पवयीन मुलांमधील जुन्या वादातून एका 17 वर्षीय मुलावर तलवारीने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. विश्रांतवाडी परिसरात रविवारी रात्री हा प्रकार घडला. या हल्ल्यात मुलाच्या डोक्यावर, हातावर, पाठीवर आणि पायावर वार करण्यात आले. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका 19 वर्षीय तरुणाला अटक केली असून, पाच अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

https://www.prahaar.in/2026/11/11/winter-sets-in-across-maharashtra-minimum-temperatures-drop-by-2-3-degrees-weather-to-remain-dry-for-the-next-few-days/

जुन्या वादातून हल्ला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सूरज मार्शल चौरी (वय 19, रा. भीमनगर, विश्रांतवाडी) याचे तक्रारदार मुलासोबत पूर्वी भांडण झाले होते. याच वादातून दोघांमध्ये पुन्हा संघर्ष झाला.

रविवारी रात्री लक्ष्मीपूजनाचा उत्सव सुरू असताना तक्रारदार मुलगा घरी जात होता. त्यावेळी चौरी याने त्याला शिवीगाळ केली आणि आपल्या अल्पवयीन साथीदारांना बोलावून घेतले. त्यानंतर टोळीतील मुलांनी तलवारीने त्याच्यावर वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला.

पोलिसांकडून सहा जणांवर कारवाई

हल्ल्यानंतर जखमी मुलाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम राबवून सहा जणांना ताब्यात घेतले. यामध्ये पाच अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. सूरज मार्शल चौरी याला अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणातील इतर पसार आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिली. अल्पवयीन मुलांमधील वादातून घडलेल्या या हिंसक प्रकारामुळे विश्रांतवाडी परिसरात खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here