Home क्रीडा IND vs NZ: भारत-न्यूझीलंड तिसरा एकदिवसीय सामना कधी, कुठे आणि कसा पाहायचा? जाणून घ्या सर्व डिटेल्स

IND vs NZ: भारत-न्यूझीलंड तिसरा एकदिवसीय सामना कधी, कुठे आणि कसा पाहायचा? जाणून घ्या सर्व डिटेल्स

0
IND vs NZ: भारत-न्यूझीलंड तिसरा एकदिवसीय सामना कधी, कुठे आणि कसा पाहायचा? जाणून घ्या सर्व डिटेल्स
IND vs NZ: भारत-न्यूझीलंड तिसरा एकदिवसीय सामना कधी, कुठे आणि कसा पाहायचा? जाणून घ्या सर्व डिटेल्स (Photo: BCCI Twitter)

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. त्यामुळे उर्वरित तीन पैकी एक सामना जिंकला की वनडे मालिका भारताच्या खिशात जाईल. दुसरीकडे, न्यूझीलंडसाठी प्रत्येक सामना करो या मरोची लढाई आहे. अशा स्थितीत तिसऱ्या वनडे सामन्याचं महत्त्व वाढलं आहे. भारताने तिसरा वनडे सामना जिंकला तर टी20नंतर वनडे मालिकाही खिशात घालेल. दरम्यान, शेवटच्या दोन सामन्यात शुभमन गिल आणि इतर कसोटी खेळणारे खेळाडू नसतील. तर कर्णधारपदाची धुरा श्रेयस अय्यरच्या खांद्यावर असेल. अशा स्थितीत शेवटच्या दोन सामन्यात जोखीम पत्कारणं भारतीय संघाला परवडणारं नाही. त्यामुळे तिसरा वनडे सामना जिंकण्यासाठी भारताचे प्रयत्न असतील. भारताने यापूर्वी 2019 मध्ये न्यूझीलंडला 4-1 ने पराभवाची धूळ चारली होती. जर तिसरा वनडे सामना गमावला तर सात वर्षानंतर न्यूझीलंड घरच्या मैदानावर वनडे मालिका गमावेल.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा सामना हॅमिल्टनमध्ये होत आहे. या मैदानात भारताने मागच्या 10 वर्षात एकही वनडे सामना जिंकलेला नाही. या मैदानात शेवटचा विजय 2015 मध्ये मिळाला होता. त्यांतर या मैदानात भारताने 12 वनडे सामने खेळले आणि प्रत्येक वेळी पराभवाचं तोंड पाहावं लागलं. दुसरीकडे, या मैदानात न्यूझीलंडने मागच्या 9 वर्षात एकही वनडे सामना गमावलेला नाही. 2017 पासून या मैदानात न्यूझीलंड संघाचा वरचष्मा आहे.

https://www.prahaar.in/2026/11/09/wi-vs-ban-second-test-match-ends-in-a-draw-west-indies-win-the-test-series-1-0-against-bangladesh/

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना कधी आणि कोठे खेळवला जाईल?

हा सामना मंगळवार, 10 नोव्हेंबर 2026 रोजी हॅमिल्टन येथील सेडन पार्क मैदानावर खेळवला जाईल.

सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार किती वाजता सुरू होईल आणि नाणेफेक कधी होईल?

सामना सकाळी 7.30 वाजता सुरू होईल, तर सामन्याची नाणेफेक सकाळी 7.00 वाजता होईल.

हा सामना टीव्हीवर थेट कोठे पाहता येईल?

तुम्ही सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या (Sony Sports Network) विविध चॅनल्सवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकता.

मोबाईल किंवा डिजिटल उपकरणांवर सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग कोठे उपलब्ध असेल?

मोबाईल आणि इतर डिजिटल उपकरणांवर हा सामना सोनी लिव्ह (SonyLIV) ॲपवर थेट पाहता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here