Home देश दिवाळीचा आनंद क्षणात संपला! मध्य प्रदेशात भीषण आग, 2 कुटुंबांतील 12 जणांचा दुर्दैवी मृत्यू

दिवाळीचा आनंद क्षणात संपला! मध्य प्रदेशात भीषण आग, 2 कुटुंबांतील 12 जणांचा दुर्दैवी मृत्यू

0
दिवाळीचा आनंद क्षणात संपला! मध्य प्रदेशात भीषण आग, 2 कुटुंबांतील 12 जणांचा दुर्दैवी मृत्यू
मध्य प्रदेशात भीषण आग (Photo: ANI)

भोपाळ: दिवाळीच्या सणाचा आनंद साजरा करत असताना मध्य प्रदेशातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. कटनी जिल्ह्यातील बरही आणि सिवनी जिल्ह्यातील छपारा येथे घडलेल्या वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनेत दोन कुटुंबांतील एकूण 12 सदस्यांचा जागीच बळी गेला आहे. मृतांमध्ये चार महिला, तीन पुरुष आणि पाच लहान मुलांचा समावेश असून या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

कटनीच्या बरही भागात दिवाळीच्या रात्री साधारणपणे 12 वाजण्याच्या सुमारास पुरण अग्रवाल यांच्या भांड्यांच्या दुकानाला अचानक भीषण आग लागली. ही आग शेजारील तीन मजली इमारतीत वेगाने पसरली. आगीचे लोट आणि प्रचंड धुरामुळे आतमधील लोकांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. या दुर्दैवी घटनेत 77 वर्षीय पुरण अग्रवाल, त्यांची पत्नी चंद्रकला (74), सून पूनम, 14 वर्षांची आर्या, 6 वर्षांची अन्वी आणि अवघ्या दोन महिन्यांच्या चिमुकल्या बाळाचा होरपळून मृत्यू झाला. सुदैवाने रितेश अग्रवाल आणि त्यांची मेहुणी कशीबशी बाहेर पडण्यात यशस्वी झाले आणि त्यांनी आरडाओरडा करून लोकांना गोळा केले.

https://www.prahaar.in/2026/11/09/a-horrific-incident-occurred-while-bursting-firecrackers-with-friends-a-rocket-pierced-a-minor-boys-abdomen-and/

या घटनेनंतर प्रशासनाचे ढिसाळ नियोजन उघड झाले आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, आग लागल्यानंतर जवळपास एक तासाने अग्निशमन दल पोहोचले, पण बंबाचा पाईप तुटलेला आढळला. त्यानंतर दुसऱ्या ठिकाणाहून आलेल्या बंबाचीही तीच गत होती. अखेर स्थानिकांनी आणि तरुणांनी दाखवलेल्या धाडसाने आणि जेसीबीच्या साहाय्याने घराची भिंत तोडून बचावकार्य करावे लागले. प्रशासकीय यंत्रणेच्या या दिरंगाईमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

दुसरी दुर्दैवी घटना सिवनी जिल्ह्यातील छपारा येथील महावीर वॉर्डमध्ये घडली. सोमवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास प्रसिद्ध सराफा व्यापारी कुंदन सोनी यांच्या घरात अचानक आग लागली. या घरातील 10 पैकी 6 जण आगीच्या आगीत भक्षक झाले. कुंदन लाल सोनी (75), राजकुमारी सोनी (65), रितू सोनी (42), स्मृती सोनी (40), सूर्य सोनी (45) आणि 16 वर्षांचा आदित्य सोनी यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. तर अमायरा सोनी (7), रितेश सोनी (45), सौरभ सोनी (43) आणि आकर्ष सोनी (14) या चार जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.

https://www.prahaar.in/2026/11/09/major-fire-breaks-out-at-raheja-garden-complex-in-thane-deputy-chief-minister-eknath-shinde-arrives-at-the-scene-rescue-operations-underway/

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले, पण तोपर्यंत घराचे मोठे नुकसान झाले होते. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात असून पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. सणाच्या दिवशी घडलेल्या या दोन दुर्दैवी घटनांमुळे मध्य प्रदेशसह संपूर्ण देश हळहळला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here