मुंबई: मुंबई महानगर क्षेत्रामध्ये (MMR) रेल कनेक्टिव्हिटी मजबूत करण्याच्या दृष्टीने उपाययोजना आखल्या आहेत. पनवेल ते वसई दरम्यानच्या प्रस्तावित उपनगरीय रेल्वे कॉरिडॉरच्या उभारणीला केंद्र सरकारकडे 12710 कोटी 82 लाख रुपयांचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. पनवेल- वसई मार्ग सुमारे 69.23 किमी लांबीची मार्गिका मुंबई शहरी परिवहन प्रकल्प (एमयूटीपी-3B) अंतर्गत बांधण्याची योजना करण्यात आली आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर, पनवेल आणि वसई- विरार दरम्यान थेट लोकल ट्रेन सेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
https://www.prahaar.in/2026/11/08/major-fire-breaks-out-in-a-high-rise-building-in-andheri-one-person-dies-of-suffocation-from-smoke/
मुंबई शहरी परिवहन प्रकल्प अंतर्गत, प्रस्तावित पनवेल-वसई रेल्वे मार्ग 69.23 किमी लांबीचा असून या मार्गावर 17 स्थानकं बांधण्यात येणार आहेत. मार्गावरील महामार्ग आणि खाड्या यांसारख्या भौगोलिक मर्यादा लक्षात घेता, सुमारे 28 किलोमीटरचा उन्नत मार्ग तयार केला जाणार आहे. यामुळे दाट लोकवस्तीच्या आणि विकसनशील शहरी भागांमधून रेल्वे मार्ग बांधणे शक्य होणार आहे. सध्या, पनवेलहून वसई- विरार परिसरापर्यंत थेट उपनगरीय लोकल ट्रेन सेवा उपलब्ध नाही. प्रवाशांना कुर्ला, दादर किंवा इतर स्थानकांवर ट्रेन बदलावी लागते. या नवीन कॉरिडॉरमुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरांना थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. यामुळे नोकरदारांना दररोजच्या प्रवाशाचा वेळ आणि त्रास कमी होण्याची अपेक्षा आहे.
https://www.prahaar.in/2026/11/08/municipal-bond-process-gains-momentum-agency-appointed-to-translate-documents-from-marathi-to-english/
पनवेल, भिवंडी आणि वसई- विरारमध्ये वेगाने लोकवस्ती आणि औद्योगिक क्षेत्रांचा विकास होत आहे. प्रस्तावित रेल्वे मार्गामुळे या भागांमधील नागरिकांना आणि नोकरदारांना उपनगरीय रेल्वे कनेक्टिव्हिटीसोबत जोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. तिसरी आणि चौथी मुंबई म्हणून विकसित होणार्या नवीन शहरी भागांसाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पालघर जिल्ह्यात विकसित होत असलेल्या वाधवान बंदरासाठीही हा कॉरिडॉर महत्त्वाचा ठरू शकतो. बंदर सुरू झाल्यामुळे या प्रदेशात औद्योगिक सामानांची ने- आण आणि रोजगार वाढल्यावर वाहतुकीची मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. सुधारित रेल्वे कनेक्टिव्हिटी या गरजा पूर्ण करण्यास मदत करेल.
दरम्यान, पनवेल- कर्जत उपनगरीय रेल्वे कॉरिडॉरचे जवळपास 99 टक्के काम पूर्ण झाले आहे. एमआरव्हीसीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विलास एस. वाडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पनवेल- वसई प्रकल्पाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करण्यात आला आहे. हा प्रस्तावित प्रकल्प पनवेल- वसई रेल्वे कॉरिडॉर हा रेल्वेचं जाळं विस्तारण्यासाठी महत्वाचा ठरणार असल्याचे सांगण्यात येत आहे.