Diwali Makeup Tips: सध्या सगळीकडे दिवाळी सणानिमित्त सगलिकडे आनंदाचे वातारण आहे. नवीन कपडे घालून, छान तयार होऊन रोषणाईत फोटो काढले जातात. परंतु, सण म्हंटल की कामाची धावपळ आलीच. अशा वेळी स्वतः तयार होणे राहून जाते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी महिलांची सकाळपासूनच लगबग सुरू असते. घराची साफसफाई, सजावट, फराळाची तयारी आणि पूजेची धावपळ यात स्वतःकडे लक्ष द्यायलाही वेळ मिळत नाही. अशा वेळी मेकअपसाठी तासन् तास घालवायला महिलांकडे वेळ नसतो. अश्या वेळी काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही अवघ्या १० मिनिटांत सुंदर आणि आकर्षक लूक मिळवू शकता. विशेष म्हणजे, हा मेकअप नॅचरल दिसतो आणि तुमचा वेळही वाचवतो. कसे ते आज आपण जाणून घेऊया. मात्र, मेकअप सुरू करण्यापूर्वी चेहरा फेसवॉशने स्वच्छ धुवा आणि त्वचा हायड्रेटेड ठेवण्यासाठी चांगले मॉइश्चरायझर लावा.
https://www.prahaar.in/2026/11/08/sayali-sanjeev-sayali-sanjeevs-traditional-maharashtrian-look-for-diwali-fans-left-swooning-over-beautiful-photos-of-her-in-a-pink-paithani-saree/
1. मॉइश्चरायझर लावल्यानंतर सीसी क्रीम लावा. सीसी क्रीम बीबी क्रीमपेक्षा जास्त ॲडव्हान्स आहे. त्यामुळे तुम्हाला खूप कमी प्रमाणात सीसी क्रीम लावावे लागेल.
2. त्यानंतर काजळ लावा. काजळ लावल्याने तुमचे डोळे चांगले ठळक दिसतील. तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही काजळ वापरू शकता. शक्यतो काजळ स्मज फ्री वापरा.
3. डल चेहरा देखील ब्राइट करण्यात लिपस्टिकचा चांगला वाटा आहे. त्यामुळे लिपस्टिक लावा. अशा स्थितीत सणासुदीला तुम्ही ब्राइट किंवा डार्क रंगाची लिपस्टिक लावू शकता. लिपस्टिक लावल्याने तुमचा मेकअप पूर्ण होईल.
4. ब्लश लावा. जर तुमच्याकडे ब्लशर नसेल तर तुम्हाला यासाठी अजिबात काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही लिपस्टिकमधून ब्लशर बनवू शकता. तुमच्या गालावर थोड्या प्रमाणात लिपस्टिक लावा आणि ते चांगले ब्लेंड करा.
5. शेवटी, मस्कारा देखील तुम्ही इंस्टंट लावू शकता. यामुळे तुमच्या पापण्या जाड दिसतील. यामुळे तुमचे डोळे खूप सुंदर दिसतील. आणि तुमचा मेकअप पूर्ण होतो.