दिवाळीच्या काळात शेअर्स खरेदी करणे ही शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची एक परंपरा आहे. या पार्श्वभूमीवर उद्या ८ नोव्हेंबर रोजी दिवाळीच्या दिवशी शेअर बाजार थोड्या काळासाठी खुला राहील. बीएसई (BSE) आणि एनएसई (NSE) या दोन्ही एक्सचेंजवर व्यवहार सुरु राहतील. या काळात गुंतवणूकदारांना त्यांचे आवडते शेअर्स खरेदी करता येतील. हिंदू पंचांगानुसार दिवाळीत नवीन वर्षाची सुरुवात होत असल्याने दिवाळीत शेअर्स खरेदी करणे शुभ मानले जाते. ट्रेडिंग मुहूर्त वर्षातून एकदाच दिवाळीत असतो. नेहमीप्रमाणे या वेळीही ट्रेडिंग मुहूर्त एक तासाचा असेल. बीएसई आणि एनएसई यांनी ट्रेडिंग मुहूर्ताच्या वेळा जाहीर केल्या आहेत. यावर्षीचा ट्रेडिंग मुहूर्त किती वाजता असेल जाणून घेऊया.
शेअर बाजार सहसा रविवारी बंद असतो, पण यावेळी रविवारी दिवाळी असल्यामुळे शेअर बाजार ट्रेडिंग मुहूर्तासाठी उघडा राहील. बाजार फक्त एका तासासाठी उघडा राहील, म्हणजेच ट्रेडिंग मुहूर्त ८ नोव्हेंबर रोजी दुपारी २:२० ते ३:३० च्या दरम्यान असेल आणि शेअर बाजार याच कालावधीत उघडा राहील. पूर्व सत्र दुपारी २.०५ ते २.२० च्या दरम्यान आयोजित केले जाईल. ब्लॉक डीलची वेळ दुपारी १.५० ते २.०५ च्या दरम्यान असेल. समारोप सत्र (सीएसएस व्यतिरिक्त) ३.३० ते ३.५० च्या दरम्यान असेल. समारोप सत्र (सीएसएस) ३.३५ ते ३.५० च्या दरम्यान असेल. समारोपानंतरचे सत्र दुपारी ३.५० ते ४ च्या दरम्यान आयोजित केले जाईल.
https://www.prahaar.in/2026/11/07/nashik-tcs-case-big-update-in-tcs-case-case-filed-against-11-people-including-former-mp-corporator/
रविवार, ८ नोव्हेंबर, दिवाळीच्या दिवशी मुहूर्ताच्या व्यापारासाठी एक्सचेंज उघडतील. सोमवार, ९ नोव्हेंबर रोजी कामकाज नेहमीप्रमाणे सुरु होईल. मंगळवार, १० नोव्हेंबर रोजी दिवाळी बलिप्रतिपदा निमित्त बीएसई आणि एनएसई दोन्ही बंद राहतील. तसेच मंगळवार २४ नोव्हेंबर रोजी प्रकाश गुरुपर्वानिमित्तही एक्सचेंज बंद राहतील. सलग सातव्या दिवशी नेत्रदीपक तेजी दिसून आली आहे. ६ नोव्हेंबर रोजी भारतीय शेअर बाजारांमध्ये सलग सातव्या दिवशी मोठी वाढ नोंदवली गेली. निफ्टी २.०१ टक्क्यांनी म्हणजेच ४९३.७५ अंकांनी वाढून २५,०३० वर बंद झाला. तर सेन्सेक्स २.१७ टक्क्यांनी म्हणजेच १७१८ अंकांनी वाढून ८१,०२८ वर बंद झाला.