Home मनोरंजन Ramayana Movie: रणबीर कपूरच्या ‘रामायण’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात; पहिल्याच दिवशी केली कोट्यवधींची कमाई!

Ramayana Movie: रणबीर कपूरच्या ‘रामायण’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात; पहिल्याच दिवशी केली कोट्यवधींची कमाई!

0
Ramayana Movie: रणबीर कपूरच्या ‘रामायण’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात; पहिल्याच दिवशी केली कोट्यवधींची कमाई!
(Photo: Social media)

रणबीर कपूरचा फेमस ‘रामायण’ चित्रपट अखेर 5 नोव्हेंबर 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये बऱ्याच दिवसांपासून उत्सुकता होती. चित्रपट प्रदर्शित होताच त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. विशेष म्हणजे पहिल्या दिवसाच्या कमाईच्या बाबतीत या चित्रपटाने बॉलिवूडमधील अनेक मोठ्या चित्रपटांना मागे टाकले आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांचा मनावर राज्य केले आहे.(Ramayana)

पहिल्याच दिवशी 64.85 कोटींची कमाई

‘रामायण’ चित्रपटाने भारतात पहिल्याच दिवशी 64.85 कोटी रुपयांची नेट कमाई केली आहे. तर चित्रपटाचे भारतातील ग्रॉस कलेक्शन 77.50 कोटी रुपये इतके झाले आहे. हिंदीसह कन्नड, तेलुगू, तमिळ आणि मल्याळम अशा पाच भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये हिंदी भाषेतील प्रदर्शनाचा कमाईत सर्वाधिक वाटा आहे. त्यामुळे या चित्रपटाने बाकीचा बॉलीवूड चित्रपटांना मागे टाकले आहे असे म्हणायला हरकत नाही.(RanbirKapoor)

https://www.prahaar.in/2026/11/06/zee-marathi-diwali-2026-from-childhood-diwalis-to-the-present-day-zee-marathi-actors-share-their-special-memories/

‘पठाण’ आणि ‘ॲनिमल’चे रेकॉर्ड मोडले

रणबीर कपूरच्या ‘रामायण’ने पहिल्या दिवसाच्या कमाईच्या बाबतीत अनेक लोकप्रिय चित्रपटांना मागे टाकले आहे. शाहरुख खानचा ‘पठाण’ आणि रणबीर कपूरचाच ‘ॲनिमल’ या चित्रपटांच्या ओपनिंग डे कलेक्शनपेक्षा ‘रामायण’ची कमाई अधिक आहे. रामायणची पहिल्या दिवसाची कमाई ही 64.85 कोटी रुपये असून रामायण या चित्रपटाने ॲनिमल आणि पठाण सारख्या चित्रपटांना मागे टाकले आहे.

‘धुरंधर 2’चा विक्रम मात्र कायम

‘रामायण’ने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले असले तरी ‘धुरंधर 2’चा पहिल्या दिवसाच्या कमाईचा विक्रम अद्याप कायम आहे. रणवीर सिंहच्या ‘धुरंधर 2’ने पहिल्याच दिवशी सुमारे 102.55 कोटी रुपयांची कमाई केली होती. तसेच प्रभासच्या ‘आदिपुरुष’ने पहिल्या दिवशी 86.75 कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यामुळे या दोन्ही चित्रपटांना मागे टाकण्यात ‘रामायण’ला यश आलेले नाही.(BoxOffice)

https://www.prahaar.in/2026/11/06/ind-vs-ban-will-the-indian-team-tour-bangladesh-in-january-2027-has-the-two-year-long-complication-been-resolved/

दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार ‘रामायण’

विशेष म्हणजे हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पहिला भाग 5 नोव्हेंबर 2026 रोजी प्रदर्शित झाला असून दुसरा भाग दिवाळी 2028 मध्ये प्रदर्शित होण्याचे नियोजन आहे. भारतीय संस्कृतीतील महत्त्वाची कथा आधुनिक तंत्रज्ञान आणि भव्य दृश्यांच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर साकारण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.

दुसऱ्या दिवसाच्या कमाईकडे लक्ष

पहिल्या दिवसाच्या कमाईनंतर आता चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाच्या कलेक्शनकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांचा फायदा चित्रपटाला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी दिवसांत चित्रपटाच्या कमाईत किती वाढ होते आणि तो आणखी कोणते विक्रम आपल्या नावावर करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.(RamayanaMovie)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here