Home ताज्या घडामोडी Pune Airport: पुणे विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई, बँकॉकहून ड्रॅगन फ्रूटच्या पॅकेटमध्ये केली जात होती गांजाची तस्करी

Pune Airport: पुणे विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई, बँकॉकहून ड्रॅगन फ्रूटच्या पॅकेटमध्ये केली जात होती गांजाची तस्करी

0
Pune Airport: पुणे विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई, बँकॉकहून ड्रॅगन फ्रूटच्या पॅकेटमध्ये केली जात होती गांजाची तस्करी
पुणे विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई, बँकॉकहून ड्रॅगन फ्रूटच्या पॅकेटमध्ये केली जात होती गांजाची तस्करी फोटो सौजन्य: ANI News

पुणे: अंमली पदार्थाच्या तस्करीविरोधात एक मोठे यश मिळवत, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कस्टम विभागाने बँकॉकहून आलेल्या एका भारतीय प्रवाशाला अटक केली आहे. प्रवाशाच्या ट्रॉली बॅगची तपासणी केली असता, अधिकाऱ्यांना तब्बल 10.642 किलोग्रॅम उच्च प्रतीचा हायड्रोपोनिक गांजा ताब्यात घेतला आहे. जप्त केलेल्या या अमली पदार्थांचे आंतरराष्ट्रीय बाजारात एकूण अंदाजित मूल्य सुमारे 3.72 कोटी रुपये असण्याचा अंदाज आहे. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर बँकॉकहून आलेल्या एका भारतीय प्रवाशाकडून सुमारे 3.72 कोटी रुपये किमतीचा 10.642 किलो हायड्रोपोनिक वीड हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला असल्याची माहिती कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

https://www.prahaar.in/2026/11/06/diwali-advance-aid-of-%e2%82%b94372-crore-for-87-45-lakh-drought-affected-farmers/

“फ्रीझ ड्राइड मंथाँग ड्युरियन” असं लेबल लावलेल्या व्हॅक्यूम- सील केलेल्या पाकिटांमध्ये हे अंमली पदार्थ लपवण्यात आले होते. हे पॅकेट प्रवाशाच्या चेक- इन सामानांमध्ये नूडल्ससारख्या इतर खाद्यपदार्थांमध्ये लपवण्यात आले होते. पुण्याच्या कस्टम विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला एनडीपीएस कायद्यान्वये अटक करण्यात आली असून, त्याला 18 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या आंतरराष्ट्रीय तस्करी टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. बँकॉकहून पुण्याला येणाऱ्या एका प्रवाशाकडून 3.72 कोटी रुपये किंमतीचे हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला असल्याची माहिती, पुणे सीमाशुल्क विभागाचे उपायुक्त धीरम मोरे यांनी दिले आहे.

 

पुणे सीमाशुल्क विभागाने केलेल्या तपासणीदरम्यान, बँकॉकवरून पुण्यामध्ये आलेल्या प्रवाशाने आपल्या सामानात अंदाजे 10.6 किलोग्रॅमचा हायड्रोपोनिक गांजा लपवलेला होता. या अंमली पदार्थाचे बाजारमूल्य अंदाजे 35 लाख रुपये प्रति किलोग्रॅम इतके होते. या संपूर्ण मालाचे एकूण मूल्य अंदाजे 3.72 कोटी रुपये इतके आहे. पुणे सीमाशुल्क विभागाचे उपायुक्त धीरज मोरे यांनी माध्यमांसोबत संवाद साधताना सांगितले की, “बँकॉकवरून पुण्यामध्ये आलेल्या विमानातील एका प्रवाशाकडे प्रतिबंधित अंमली पदार्थाचा मोठ्या प्रमाणावरचा साठा आढळून आला आहे. तपासणीदरम्यान, प्रवाशाने आपल्या सामानात अंदाजे 10.6 किलोग्रॅमचा हायड्रोपोनिक गांजा लपवले असल्याचे आढळून आले. ‘हायड्रोपोनिक गांजा’ने भरलेली नऊ पाकिटे सापडली आहेत. आज कस्टम विभागाला तस्करीची एक नवीन पद्धत उघडकीस आली आहे. थायलंडमध्ये विकल्या जाणाऱ्या ‘दुरियन’ नावाच्या सुक्या फळाच्या पाकिटांमध्ये हे अंमली पदार्थ लपवले होते.”

https://www.prahaar.in/2026/11/06/pune-anand-yatri-mandal-distributed-festive-faral-to-residents-of-drought-affected-areas-in-pathardi-taluka-ahilyanagar-district/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here