Home देश Delhi Fire News : दिल्लीतील गफ्फार मार्केटमध्ये भीषण आग; 22 अग्निशमन गाड्या घटनास्थळी

Delhi Fire News : दिल्लीतील गफ्फार मार्केटमध्ये भीषण आग; 22 अग्निशमन गाड्या घटनास्थळी

0
Delhi Fire News : दिल्लीतील गफ्फार मार्केटमध्ये भीषण आग; 22 अग्निशमन गाड्या घटनास्थळी
दिल्लीतील गफ्फार मार्केटमध्ये भीषण आग; 22 अग्निशमन गाड्या घटनास्थळी (Photo X)

Delhi Fire News: राजधानी दिल्लीतील करोल बाग येथील गफ्फार मार्केटमधील एका दुकानाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. चैन वाली गल्लीतील 13 ब्लॉकमधील पुरी प्लाझा येथील दुकानात ही आग लागली. आगीची तीव्रता लक्षात घेऊन अग्निशमन दलाच्या 22 गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आग नियंत्रणात आणण्यात आली असून, या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाल्याचे वृत्त नाही. मात्र, दुकानातील मालमत्तेचे नुकसान झाले आहे.

https://www.prahaar.in/2026/11/06/will-the-municipal-corporation-receive-assistance-from-vantara-to-bring-lions-from-gujarat/

बॅटरी ओव्हरचार्जिंगमुळे आग लागल्याचा प्राथमिक संशय

प्राथमिक माहितीनुसार, बॅटरी जास्त गरम होणे किंवा ओव्हरचार्ज होणे हे आगीचे संभाव्य कारण असू शकते. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. यासाठी अग्निशमन विभाग आणि विद्युत निरीक्षकांकडून अहवाल मागवण्यात येणार आहे.

याशिवाय, इमारतीमध्ये इतर कोणते ज्वलनशील पदार्थ होते का, याची तपासणी करण्यासाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) पथकाकडून पाहणी केली जाणार आहे. तपासानंतरच आगीचे नेमके कारण स्पष्ट होईल.

लक्ष्मी नगरमध्येही पहाटे आग

दरम्यान, दिल्लीतील लक्ष्मी नगर परिसरातील मंगल बाजार येथे गुरुवारी पहाटे आणखी एका आगीची घटना घडली. अग्निशमन अधिकारी दीपक हुडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे 5:50 वाजण्याच्या सुमारास अग्निशमन दलाला आगीची माहिती मिळाली.

माहिती मिळताच 4 ते 5 अग्निशमन गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. अग्निशमन दलाने तातडीने कारवाई करत आग विझवली. या घटनेतही कोणालाही दुखापत झाली नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

दिल्लीतील दोन्ही घटनांमध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही. गफ्फार मार्केटमधील आगीचे कारण शोधण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून तपास केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here