Home ब्रेकिंग न्यूज Satara News : दिवाळीसाठी घरी निघाले, पण वाटेतच अपघात; साताऱ्यात प्रशिक्षणार्थी पोलिसांच्या बसला धडक, 15 जखमी

Satara News : दिवाळीसाठी घरी निघाले, पण वाटेतच अपघात; साताऱ्यात प्रशिक्षणार्थी पोलिसांच्या बसला धडक, 15 जखमी

0
Satara News : दिवाळीसाठी घरी निघाले, पण वाटेतच अपघात; साताऱ्यात प्रशिक्षणार्थी पोलिसांच्या बसला धडक, 15 जखमी
दिवाळीसाठी घरी निघाले, पण वाटेतच अपघात; साताऱ्यात प्रशिक्षणार्थी पोलिसांच्या बसला धडक, 15 जखमी

Satara News: दिवाळीची सुट्टी साजरी करण्यासाठी घराकडे निघालेल्या पोलीस प्रशिक्षणार्थींवर साताऱ्यात अपघाताचे संकट ओढवले. कराड तालुक्यातील मसूरजवळ धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थींच्या खासगी बसचा मध्यरात्री अपघात झाला. या दुर्घटनेत 3 चालकांसह 12 पोलीस प्रशिक्षणार्थी असे एकूण 15 जण जखमी झाले आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे पर्यायी मार्गाचा वापर

मिळालेल्या माहितीनुसार, धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी दिवाळीच्या सुट्टीसाठी खासगी ट्रॅव्हल्सने धुळ्याहून कोल्हापूरच्या दिशेने निघाले होते. मध्यरात्री सुमारे 2:30 वाजण्याच्या सुमारास मसूरजवळ बसचा अपघात झाला.

https://www.prahaar.in/2026/11/06/will-reduce-expenditure-on-drain-cleaning-works/

ऊसदराच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग रोखल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे बसचालकाने रहिमतपूर-मसूर या पर्यायी मार्गाने कराडकडे जाण्याचा निर्णय घेतला. या मार्गावर प्रवास करत असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य

अपघाताची माहिती मिळताच मसूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले. जखमींना रुग्णवाहिकेतून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

जखमी प्रशिक्षणार्थी सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यांतील रहिवासी आहेत. दिवाळीच्या सुट्टीसाठी आनंदाने घराकडे निघालेल्या प्रशिक्षणार्थींच्या प्रवासात या अपघातामुळे व्यत्यय आला. या घटनेचा पुढील तपास मसूर पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here