मुंबई: पश्चिम रेल्वेनंतर आता मध्य रेल्वेनेही प्रवाशांसंबंधित महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दिवाळी सण आणि छट पूजेनिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उत्तर भारतामध्ये मोठ्या उत्साहामध्ये छट पूजा साजरी करण्यात येते. यामुळे दिवाळी सणाच्या आधीपासूनच रेल्वे स्थानकांवर गावी जाणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळते. प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता, पश्चिम रेल्वेनंतर आता मध्य रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेकडून प्लॅटफॉर्म तिकिट पुढील काही दिवस बंद करण्यात आलं आहे.
https://www.prahaar.in/2026/11/06/cm-devendra-fadnavis-and-both-dcm-distribute-house-keys-to-557-families-from-the-bdd-chawls/
दिवाळी आणि छट पूजेनिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेत मध्य रेल्वेच्या मुंबई मंडळाने प्रवाशांची होणारी वाढती गर्दी लक्षात घेता, प्लॅटफॉर्म तिकिट न देण्याचा हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 5 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर या तारखेदरम्यान, मध्य रेल्वेने प्रवाशांना प्लॅटफॉर्म तिकिट न देण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई सीएसएमटी, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे आणि कल्याण या पाच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना प्लॅटफॉर्म तिकिट मिळणार नाही. सणासुदीच्या काळामध्ये ज्यांच्याकडे प्रवासाचे वैध तिकिट असेल त्याच प्रवाशांना रेल्वे स्थानकांवर परवानगी देण्याचा मानस मध्य रेल्वेचा आहे.
https://www.prahaar.in/2026/11/06/bmc-ashray-yojana-sanitation-workers-are-the-true-heroes-of-mumbai-the-government-is-committed-to-providing-them-with-the-homes-they-are-entitled-to-asserts-deputy-chief-minister-eknath-shinde/
हा महत्त्वाचा निर्णय पश्चिम रेल्वेने सुद्धा घेतला आहे. वांद्रे टर्मिनस, वापी, वलसाड, उधना, सुरत आणि भेस्तान या सहा स्थानकांवर प्रवाशांना 15 नोव्हेंबरपर्यंत प्लॅटफॉर्म तिकिट मिळणार नाही. उत्तर रेल्वेवरील नवी दिल्ली, दिल्ली जंक्शन (जुनी दिल्ली), हजरत निजामुद्दीन, आनंद विहार टर्मिनल आणि आनंद विहार हॉल्ट अशा पाच रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटाची विक्री करणं बंद असणार आहे. याशिवाय, गाझियाबाद रेल्वे स्थानकावरही प्लॅटफॉर्म तिकिट मिळणार नाही. सणासुदीच्या काळात स्थानकावर मोठ्या संख्येने प्रवासी येतात. त्यामुळे फलाटावरील अनावश्यक गर्दी नियंत्रित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले असल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे.
https://www.prahaar.in/2026/11/06/heart-wrenching-tragedy-in-borivali-two-and-a-half-year-old-child-crushed-to-death-between-two-vehicles-accused-doctor-granted-bail/
कुणाला मिळणार सवलत?
परंतू, सुरक्षेच्या कारणामुळे प्लॅटफॉर्म तिकिट न देण्याचा निर्णय घेतला असला तरी काही गरजू प्रवाशांच्या मदतीसाठी येणाऱ्या नातेवाईकांना यामधून सुट देण्यात येईल, असे रेल्वेने स्पष्ट केले आहे. ज्येष्ठ नागरिकांना सोडायला आणि घ्यायला येणाऱ्या नातेवाईकांना, आजारी प्रवाशांच्या मदतीला येणारे नातेवाईक, छोट्या मुलांसोबत प्रवास करणारे नातेवाईक तसेच महिला प्रवाशांसोबत येणारे नातेवाईक यांना यामध्ये सूट देण्यात देणार आहे.