मुंबई: राज्यात सध्या दिवाळीचे आनंदमय वातावरण सुरु आहे. गोरगरीब जनतेपासून नोकरदार वर्गापर्यंत सगळेजण दिवाळी साजरी करत आहेत. त्यातील सफाई कामगारांसाठी सरकारने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आश्रय योजना कक्ष टप्पा दोनअंतर्गत नव्याने बांधण्यात आलेल्या कर्मचारी निवासस्थानांच्या चाव्या वाटपाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर करण्यात आला.
मुंबईचे आरोग्य जपणाऱ्या आणि शहर स्वच्छ ठेवण्यासाठी दिवसरात्र मेहनत करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. मुंबईचे खरे हिरो हे सफाई कर्मचारी हेच असून त्यांना चांगले जीवनमान आणि सन्मानाचे निवासस्थान मिळणे ही सरकारची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
140 सफाई कर्मचाऱ्यांच्या घरांच्या स्वप्नपूर्तीला आजपासून सुरुवात झाली. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, शिवसेना गटनेते अमेय घोले, अतिरीक्त आयुक्त विपीन शर्मा आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. (Mumbai Safai Karmachari News)
आधी 150 चौरस फुटांची घरे मिळायची, आता 300 चौरस फुटांची प्रशस्त घरे उपलब्ध करून दिली जात आहेत. प्रीफॅब्रिकेटेड तंत्रज्ञानाचा वापर करून जलदगतीने आणि दर्जेदार बांधकाम करण्याचा महापालिकेचा हा अभिनव प्रयोग आहे. ही घरे 100 वर्षांपेक्षा अधिक काळ टिकावीत, अशा गुणवत्तेवर भर देण्यात आला आहे. या योजनेचा लाभ लाड-पागे समितीच्या तरतुदींनुसार पात्र कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना मिळत आहे. त्यामुळे आजचा हा पहिला टप्पा असून पुढील टप्प्यांतही उर्वरित पात्र कर्मचाऱ्यांना घरे दिली जातील. पुढील चावीवाटपात सुमारे 500 ते 550 घरांचा उल्लेखही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेVaishnavi Hagawane Case Update: वैष्णवी हगवणे प्रकरणात उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; ३ जणांना जामीन मंजूर यांनी केला.
https://www.prahaar.in/2026/11/06/major-decision-by-the-high-court-in-the-vaishnavi-hagwane-case-bail-granted-to-3-individuals/
पहाटे मुंबईचे रस्ते स्वच्छ करणारे, कोविड काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सेवा बजावणारे आणि पूरस्थितीतही नेहमी अग्रेसर राहणारे सफाई कर्मचारी हे मुंबईचे खरे हिरो आहेत. मात्र, मुंबई स्वच्छ करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच मुंबईबाहेरून रोज प्रवास करावा लागतो. त्यामुळे त्यांना मुंबईतच हक्काची घरे मिळणे हे गरजेचे आहे. विकासकांनी नफ्यापेक्षा घरांचा दर्जा महत्त्वाचा मानून वेळेत घरे द्यावीत, असे आवाहन शिंदे यांनी केले.
सफाई कर्मचाऱ्यांची पुढील पिढीही याच व्यवसायात राहावी, अशी सरकारची मानसिकता नाही. तर त्यांच्या मुलांनी डॉक्टर, इंजिनिअर, वकील व्हावे, यासाठी मुंबई महापालिकेने विशेष उच्च शिक्षण योजना तयार करावी, असे निर्देशही त्यांनी दिले. मुंबईला झोपडपट्टीमुक्त करणे, धोकादायक इमारतींचा पुनर्विकास आणि क्लस्टर विकासातून रस्ते, उद्याने व आरोग्य सुविधा निर्माण करणे हे सरकारचे मुख्य उद्दिष्ट आहे. मुंबईच्या आधीच्या कारभारावर अप्रत्यक्ष टीका करताना काहींनी मुंबई स्वच्छ करण्याऐवजी तिजोरी स्वच्छ केली, असा अप्रत्यक्ष टोलाही शिंदे यांनी उबाठा गटाला लगावला.
दरम्यान, संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांची तातडीची मदत जमा केल्याचे सांगून त्यांना पुढील शासकीय मदत व सवलतीही दिल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. सफाई कर्मचाऱ्यांना सुविधा देणे हे उपकार नसून सरकारचे कर्तव्य आहे, असे सांगत त्यांनी सर्व लाभार्थ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.