मुंबई: इन्स्टाग्राम, फेसबूक यांसारख्या सोशल मीडियावरून टक्कल असलेल्या व्यक्तींना केस उगवणे आणि केसांची वाढ होणे असा दावा करून विक्री करण्यात येत असलेल्या आयुर्वेदिक- हेअर ऑईलचा तब्बल 50.35 लाख किंमतीचा साठा अन्न- औषध प्रशासनाच्या नाशिक विभागाने जप्त केला आहे. आयुर्वेदिक- हेअर ऑईलच्या प्रॉडक्टच्या लेबलवर उत्पादकाचे नाव, पत्ता शिवाय उत्पादन परवाना क्रमांक नमूद नसल्याचे आढळून आल्यामुळे FDA प्रशासनाने धडक कारवाई केली आहे.
https://www.prahaar.in/2026/11/06/kdmc-diwali-gift-titwala-tribal-hamlets-illuminated-with-streetlights-after-years-of-darkness/
नाशिकमधील कॉलेज रोडवरील विसे मळ्याजवळ सहजीवन कॉलनीतील रुपल अपार्टमेंटमध्ये शॉप नं. 9 मध्ये मे. व्ही. एस. न्यू फॅशन झोन या ब्युटी सलून आणि इमिटेशन ज्वेलरी व्यवसायाच्या जागेतून सोशल मीडियावर जाहिरात करून हेअर ऑईलची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती FDA ला मिळाली. त्या गोपनीय माहितीप्रमाणे चौकशी करत, उत्पादनाची पडताळणी करत FDA प्रशासनाने आयुर्वेदिक हेअर ऑईल कंपनीला दणका दिला आहे. उत्पादनाच्या लेबलवर फक्त, मार्केटेड वाय मे. व्ही. एस. न्यू फॅशन झोन, नाशिक असा उल्लेख करण्यात आला होता. वॅच क्रमांक, उत्पादन दिनांक आणि किंमत (MRP ₹ 999/- प्रति 100 मि.ली.) नमूद करण्यात आले होते. मात्र उत्पादकाचे नाव, पत्ता आणि उत्पादन परवान्याचा कोणताही तपशील नव्हता.
https://www.prahaar.in/2026/11/06/pune-airport-customs-department-seizes-10-6-kg-of-hydroponic-weed-worth-3-72-cr-rupees/
त्याप्रमाणे FDA प्रशासनाने 5 नोव्हेंवर 2026 रोजी नाशिक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी पंचांसमक्ष हेअर ऑईलच्या ऑफिसवर धाड टाकली. त्यात सदर संस्थेच्या मालकाकडे संबंधित आयुर्वेदिक उत्पादनाबाबत उत्पादन परवाना आणि इतर आवश्यक कायदेशीर परवणग्या नसल्यामुळे औषधे आणि सौंदर्य प्रसाधने कायदा, 1940 अंतर्गत VS Hair Growth Oil कंपनीच्या 100 मिलीच्या 5040 इतक्या बाटल्या जप्त केल्या. या उत्पादनाचा बॅच क्र. VS 1984 आणि उत्पादन दि. सप्टेंबर 2026 होती आणि या उत्पादनाची किंमत ₹ 999 इतकी होती. FDA प्रशासनाने जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत 50 लाख 34 हजार 960 इतकी किंमत होती. सदर हेअर ऑईल तसेच सलूनमध्ये आढळून आलेल्या इतर उत्पादनांचे नमुने चाचणी व विश्लेषणासाठी घेण्यात आले आहेत.
https://www.prahaar.in/2026/11/06/diwali-advance-aid-of-%e2%82%b94372-crore-for-87-45-lakh-drought-affected-farmers/
उत्पादनाचा प्रत्यक्ष उत्पादक उत्पादनाबाबत पुढील तपास सुरू असून, तपासात निष्पन्न होणाऱ्या बाबींनुसार संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. टक्कल घालवणे, केस उगवणे, वजन कमी करणे यांसारखे भ्रामक दावे करणाऱ्या सोशल मीडियावरील जाहिरातींना नागरिकांनी वळी पडू नये. कोणतेही औषध खरेदी करताना त्याच्या लेबलवर उत्पादकाचे नाव, पूर्ण पत्ता आमि उत्पादन परवाना क्रमांक नमूद असल्याची खात्री करावी. असा तपशील नसलेली उत्पादने खरेदी आणि वापर करू नयेत, असे आवाहन FDA ने नागरिकांना केली आहे.