मुंबई (विशेष प्रतिनिधी)
मुंबईतील बांधकामाच्या ठिकाणी प्रदुषण नियंत्रणाच्या उपाययोजनांचा भाग म्हणून हवेच्या गुणवत्तेचे मोजमाप करण्यासाठी बसवण्यात आलेल्या सेन्सर आधारीत प्रदुषक निर्देशकाच्या डिजिटल फलकांची त्रयस्थ संस्थेमार्फत ऑडीट करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. मात्र,ऑडीट करण्यासाठी संस्थेची निवड केली जात असली तरी महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्यावतीने नेमलेल्या भरारी पथकाच्या माध्यमातून योग्यप्रकारे तपासणी केली जात नाही. भरारी पथकाच्या कामगिरीबाबत शंकाच सर्वच सदस्यांनी उपस्थित केला.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबईतील सर्व बांधकाम स्थळांवर सेन्सर-आधारित हवेच्या गुणवत्तेची मोजमाप उपकरणे अर्थात प्रदूषण निर्देशक लावण्याचे आणि त्यांना केंद्रीय मॉनिटरिंग सिस्टीमशी जोडण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार मुंबईत सध्या २५०० ते ३००० बांधकामे सुरु असून यासर्व ठिकाणे सेन्सर आधारीत डिजिटल फलक बसवण्यात आले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या वतीने त्रयस्थ संस्थेमार्फत अर्थात थर्ड पार्टी ऑडीट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार महापालिकेने निविदा मागवून यातील तज्ज्ञ संस्थेची निवड केली आहे. यासाठी महाबळ एन्व्हायरो इंजिनियर्स प्रा. लि यांची निवड पुढील ३ वर्षांसाठी करण्यात आली असून या तीन वर्षांसाठी ११.२८ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.
https://www.prahaar.in/2026/11/05/overwhelming-response-to-the-exhibition-by-womens-self-help-groups-organized-for-diwali-at-the-municipal-corporation-headquarters/
याबाबतचा प्रस्ताव मंजुरीला आला असता मनसे यशवंत किल्लेदार यांनी या थर्ड पार्टी ऑडीटसाठी जी कंपनी नेमली जाणार आहे. ती कंपनीही आपले स्वतंत्र मनुष्यबळ नेमणार आहे आणि ही माणसे जर विकासकांना मॅनेज झाली तर हा ऑडीट काय असणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावर भाजपच्या प्रिती सातम यांनी बांधकामांच्या ठिकाणी जे प्रदुषक निर्देशांक बसवले आहेत ते द्रीय डॅशबोर्डशी जोडलेले आहेत की नाही, याची माहिती पर्यावरण विभागाकडे आहे का? तसेच या विभागाच्यावतीने जे संयुक्त पाहणीसाठी भरारी पथक नेमले आहे,त्यांनाच याची कल्पना नसते तर ते कारवाई काय करणार असा सवाल करत आपल्या गोरेगाव भागांमध्ये हवेच्या प्रदुषणाबाबत कुठेही भरारी पथम पाहणी तसेच कारवाई करताना दिसत नसल्याचे त्यांनी सांगितले. तर यशोधर फणसे यांनी के पश्चिम विभागात एकच अधिकारी असून त्याला तीन विभागांचे काम पहावे लागते. त्यामुळे २८ मुद्दयांची अंमलबजावणी बांधकामांच्या ठिकाणी होते का हे योग्यप्रकारे तपासले जात नसल्याचे फणसे यांनी सांगून एसआरए आणि अन्य बांधकामांची पाहणी करताना तिथे लक्ष दिले जात नसल्याचे सांगितले
तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ सईदा खान यांनी कुर्ला परिसरात वायू प्रदुषण निर्देशकांची अचूक नोंद होत नसून तयार सिमेंट प्लांटचे आरएमसीच्या गाड्या फिरत असल्याने रिक्षा वाहतूक खोळंबा होईल.त्यामुळे वाहतुकीच्या वेळी या आरएमसी वाहनांची वाहतूक होवू नये. तर प्रकाश दरेकर यांनी प्रदुषक निर्देशकांवरील नोंद केंद्रीय डॅशबोर्डवर व्हायला हवी. त अश्रफ आझमी यांनी प्रदुषणाची पातळी वाढलेली असून देवनार डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याची अंतिम विल्हेवाट लावताना दुर्गंधीचे प्रमाण वाढण्याची भीती त्यांनी व्यक्त केली
यावर उत्तर देताना महापालिका अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी मुंबईत ३००० पेक्षा अधिक बांधकामे सुरु असून तिथे बसवलेले प्रदुषक निर्देशकांची माहिती भरारी पथकाच्या माध्यमातून घेतली जाते. तरीही याचे थर्ड पार्टी ऑडीट करण्यात येणार असून कुठेही धुळफेक होणार नाही.जर बांधकामांच्या ठिकाणी प्रदुषक निर्देशांक कार्यान्वित नसल्यास त्यांना बांधकाम स्थगितीचे आदेश देवू शकतो. प्रदुषण नियंत्रणासाठी प्रयत्न सुरु असून एसआरए आणि म्हाडाचे बांधकामांमध्ये प्रदुषण होत असल्यास संबंधित प्राधिकरणांना कल्पना देवून त्यानुसार कार्यवाही करण्यास भाग पाडपले जाते. एमपीसीबीच्या माध्यमातून समन्वय सुरु असतो.