Home एक्सक्ल्युजिव्ह SAFF Championship 2026 फुटबॉल स्पर्धेत भारताने पाकिस्तानला 3-2 ने लोळवलं, असा झाला सामना

SAFF Championship 2026 फुटबॉल स्पर्धेत भारताने पाकिस्तानला 3-2 ने लोळवलं, असा झाला सामना

0
SAFF Championship 2026 फुटबॉल स्पर्धेत भारताने पाकिस्तानला 3-2 ने लोळवलं, असा झाला सामना
SAFF Championship 2026 फुटबॉल स्पर्धेत भारताने पाकिस्तानला 3-2 ने लोळवलं, असा झाला सामना (Photo: Twitter)

साउथ एशियन फुटबॉल फेडरेशन (SAFF) स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे संघ आमनेसामने आले होते. पारंपरिक प्रतिस्पर्धी असल्याने या सामन्याचं महत्त्व अधिक होतं. त्यामुळे क्रीडाप्रेमींच्या नजरा या फुटबॉल स्पर्धेतील सामन्याकडे लागल्या होत्या. या सामन्याला सुरूवात झाली आणि भारताने आक्रमक सुरूवात केली. पहिल्या 12 मिनिटात गोल मारण्याचे जोरदार प्रयत्न झाले, पण त्यात काही यश आलं नाही. 13व्या मिनिटाला भारताने एका गोलची आघाडी घेण्यात यश मिळवलं. सुहेल भटने गोल केला. त्यानंतर 19 व्या मिनिटाला पुन्हा सुहेल भटने गोल मारण्यात यश मिळवलं. पहिल्या हाफ संपण्याच्या आत भारताने आणखी एक गोल मारला. भारताच्या किपगेनने 32 व्या मिनिटाला गोल मारला आणि सामन्यावर पकड मिळवली. भारताचा आक्रमक पवित्र आणि गोल आघाडीने पाकिस्तानचा संघ गोंधळला. 35व्या मिनिटाला पाकिस्तानला पेनल्टी मिळाली. पण या संधीचं सोनं करण्यात अपयश आलं.

दुसऱ्या हाफमध्ये काय झालं?

पहिल्या हाफमध्ये भारताचा वरचष्मा राहिला. त्यामुळे हा सामना भारत सहज जिंकणार असंच वाटलं होतं. कारण भारताने पहिल्या हाफमध्ये घेतलेली 3 गोलची आघाडी मोडून काढण्याचं मोठं आव्हान पाकिस्तानसमोर होतं. शेवटच्या मिनिटांपर्यंत पाकिस्तानची धडपड सुरू होती. 90 मिनिटांचा खेळ संपल्यानंतर अतिरिक्त मिनिटात पाकिस्ताने धडाधड गोल गेले. 91 व्या आणि 94व्या मिनिटाला पाकिस्तानने गोल मारले. त्यामुळे तीन गोलची आघाडी एक गोलवर आणण्यात पाकिस्तानी संघाला यश आलं. 91 व्या मिनिटाला जुनैद शाहला बॉक्सच्या डाव्या बाजूला चेंडू मिळाला आणि नजीब उल्लाह दिशेने मारला.उल्लाहने सर्वात उंच उडी मारून हेडरद्वारे गोल मारला. अली खान गाझीने दुसरा गोल केला आणि 3-2 अशी स्थिती आणली.

https://www.prahaar.in/2026/11/05/wbbl-heading-for-a-last-ball-finish-and-a-potential-super-over-but-a-single-mistake-by-the-wicketkeeper-costs-them-the-match-watch-video/

दोन्ही संघांचे खेळाडू

भारतीय संघ: अर्श शेख (गोलकीपर), बिजॉय, उवैस, वालपुईया, सूर्यवंशी, प्रभू, रिकी शाबोंग, किपगेन, सुहेल भट, नौशाद, मोहम्मद सुहेल.

पाकिस्तान संघ: बट (गोलकीपर), उल्लाह, खटक, गाझी, दोस्त, रहमान, रझा, महमूद, अली झेब, एहतिशाम, अहमद खान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here